भाजपच्या पहिल्या यादीत अमरावती जिल्ह्यातील ‘या’ ३ नावांचा समावेश

अमरावती प्रतिनिधी। भाजपाची पहिली १२५ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा नेते अरुण सिंह यांनी ही घोषणा केली. सोबतच बहुप्रतिक्षीत असलेल्या यादीत सर्वांचे लक्ष लागून असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघाच्या उमेदवारांची देखील नावे जाहीर झाली आहेत. या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत अमरावती जिल्ह्यातील ३ नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे … Read more

चांद्रयान २ तांत्रिक अडचणींमुळं अडलं, आदित्य ठाकरे मात्र मुख्यमंत्रीपदावर पोहचतीलच – संजय राऊत

काही तांत्रिक अडचणीमुळे चांद्रयान-२ चंद्रावर पोहचू शकले नाही, मात्र आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, येणाऱ्या २१ ऑक्टोबरला आदित्य ठाकरे मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर जरूर पोहचतील – संजय राऊत

ठाकरेंचा वारस पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई प्रतिनिधी। महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रभावी असणाऱ्या ठाकरे घराण्यातुन निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती म्हणून आदित्य ठाकरेंच नाव आता निश्चित झालं आहे. जनतेची सेवा करण्यासाठी, सर्व जनतेचा आदेश मानत, आज मी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला केला आहे. सर्व भेदभाव दूर करुन, नवा महाराष्ट्र घडवण्याची “हीच ती वेळ” असं म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक … Read more

परभणी विधानसभा मतदारसंघात विकासाचा मुद्दा भावनिक होणार का ?

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे परभणी विधानसभा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. मागील तीस वर्षांपासून पक्षाने हा बालेकिल्ला अभेद्य ठेवला आहे. विरोधी पक्षाने प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांना हा गड काही उध्वस्त करणं शक्य झालं नाही पण तरीदेखील दरवेळी विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून रणनीती आखून शिवसेनेला कोंडी धरायचा प्रयत्न केला जातो. त्याला यावेळी तरी यश मिळतं का ? … Read more

निवडणुकीतील गैरव्यवहारांची नागरिक देणार माहिती

अमरावती प्रतिनिधी। अमरावती विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काळ्या पैश्याचा वापर होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी माहिती देण्याच आवाहन प्रधान प्राप्तीकर संचालक कार्यालयाचे उपसंचालक अभय नन्नावरे यांनी केले आहे. लोकशाहीच्या हा उत्सव लोकशाही मार्गाने पार पडावा म्हणून नागरिकांचा ही यांत सहभाग असावा या दृष्टीने हा निर्णय घेणार आल्याचे समजते आहे. काळ्या पैश्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी प्राप्तीकर विभागाच्या अन्वेषण … Read more

कराड विधानसभेसाठी 60 अर्जाची विक्री, मात्र अद्याप एकही अर्ज दाखल नाही

सांगली प्रतिनिधी। राज्यात निवडणूक आयोगाने होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता व निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार शुक्रवार पासून प्रत्यक्ष अर्ज विक्रीस सुरुवात झालीय. अनेकांनी आमदारकीसाठी बाशिंग बांधले असून सर्वानाच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घाई झाली. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून अर्ज विक्रीला सुरवात होते न होते तरच या इच्छुकांनी अर्ज घेऊन जाण्याची तयारी केली. सातारा जिल्ह्यातील कराड … Read more

राजकारणातील अचूक टायमिंग अजित पवारांनी साधलं, राष्ट्रवादीची गाडी पुन्हा रूळावर

शरद पवार यांना ईडी चौकशीच्या दरम्यान देण्यात येणारा त्रास आपल्याला सहन होत नसल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला, परंतु यावेळी मी याबद्दल कुणाशीही काहीच बोललो नव्हतो. या प्रकारामुळे जे दुखावले गेलेत त्यांची मी माफी मागतो. राजीनाम्याचा बऱ्याच दिवसांपासून विचार सुरु होता परंतु निर्णय होत नव्हता असं सांगत आता मात्र आपण शरद पवारांच्या म्हणण्यानेच पुढे जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले. 

ज्योतीताई पाटील यांच्या उमेदवारीबाबत संजयकाकांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

सांगली प्रतिनिधी| कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खा.संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई यांना तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याबाबत आजपर्यंत खासदारांनी मौन पाळले होते. आता मात्र कार्यकर्त्यांच्या दबावामुळे खा.संजयकाका पाटील यांनी मतदार संघाची बदलती परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या कानावर घातली असून उमेदवारीबाबत ते कार्यकर्त्यांची बैठक लवकरच घेणार असल्याचे वृत्त आहे. ज्योतीताई … Read more

शिराळा विधानसभा मतदारसंघ लढवणारच- सम्राट महाडिक

सांगली प्रतिनिधी। शिराळा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे. तिकीट मिळाल तर ठिक अन्यथा अपक्ष निवडणूक लढवणारच आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदा माघार नाही. असा इशारा सम्राट महाडीक यांनी दिला. कासेगाव येथे वनश्री नानासाहेब महाडिक प्रेमींनी आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्याप्रसंगी सम्राट महाडीक बोलत होते. वाळवा तालुक्यातील ४८ गावातील नानासाहेब महाडीक प्रेमींचा प्रचंड मोठा जनसागर … Read more

पडळकरांनी वंचितची साथ सोडल्याने होणार मोठे परिणाम

सांगली प्रतिनिधी। धनगर समाजाच्या आरक्षणावरुन राज्यभर प्रचाराची राळ उठवून अल्पावधीत प्रसिध्द झालेले नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महासचिव पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदार संघात त्यांनी वंचित घटकांचे जोरदार संघटन करुन तीन लाखांहून अधिक मते खेचली होती मात्र. आता त्यांनी … Read more