राष्ट्रवादीचा बारामतीमधील गड उध्वस्त होणार ?? अजित पवार निवडणूक लढणार नसतील तर दुसरा उमेदवार कोण?

अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील सर्व राजकीय चर्चा त्यांच्याभोवती केंद्रित झाली आहे.

‘शेतकरी संघटना’ २८८ जागा लढवणार- रघुनाथ दादा पाटील

सातारा प्रतिनिधी। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी आपआपल्या रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘शेतकरी संघटने’चे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी देखील शेतकरी संघटना पक्षाची विधानसभेसाठी आपली भूमिका मांडली आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व २८८ जागा लढवणार लढवणार असल्याची महत्व पूर्ण माहिती त्यांनी आज दिली. कराड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये … Read more

मराठा क्रांती मोर्चा शरद पवारांसोबत – आबासाहेब पाटील

मुंबई प्रतिनिधी । ‘राज्यात विधानसभा निवडणुका ईडी मार्फत सुडाच राजकारण करणं योग्य नाही’ असं मत मराठा क्रांन्ती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून पवारांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात … Read more

कोण मारणार ‘वणी विधानसभा’ क्षेत्रात बाजी; निवडणूक स्पेशल

यवतमाळ प्रतिनिधी । स्पेशल स्टोरी यवतमाळ पासून 107 किमी दूर असलेले जिल्ह्याचे शेवटच्या टोकाचे विधानसभा क्षेत्र म्हणजे वणी. वणी शहराला “ब्लॅक डायमंड सिटी” नावाने ओळखल जातं, कारण या क्षेत्रात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. वणी, मारेगाव, झरी असे तीन तालुके या विधानसभेच्या क्षेत्रात येतात. आता निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेत. प्रत्येक जण … Read more

राहुल बोन्द्रे यांच्या भाजप प्रवेशाला चिखलीत भाजप कार्यकर्त्यांचा विरोध

बुलडाणा प्रतिनिधी। विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय खलबतांनी जोर पकडला आहे. जो तो आपली जागा शाबूत ठेवण्याच्या प्रयत्नात असून विचारधारा पक्षनिष्ठा या सगळ्यांना फाट्यावर मारत अनेक नेते भाजप सेनेत प्रवेश करत आहेत. या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या इनकमिंग मुळे निष्ठावंत मात्र यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत आहेत. अशाच … Read more

भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडू – विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर

सांगली प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. आचारसंहिता भंग केल्यास तात्काळ कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला. पारदर्शी, भयमुक्त वातावरणात निवडणूका पाडण्यात येईल, तसेच दिव्यांग मतदारांच्या सोयीसुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष करण्यात येवू नये, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर … Read more

पवारांचं चारित्र्यहनन हाच भाजपचा अजेंडा, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी ।  महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सक्त वसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला अधिकच महत्व प्राप्त झालं आहे. भाजपने विरोधकांच्या प्रचाराची धार कमी करण्यासाठीच हे केल की काय अशा प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागल्या आहेत. त्याच त्यांदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर … Read more

थोरतांच्या बालकिल्यात विखेंचा सुरुंग

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण सतत याना त्या कारणाने चर्तेत असतेच. त्यात विखे अन थोरातांचा वाद तर उभा महाराष्ट्राला माहित आहे. दोघेही एकाच पक्षात होते तोपर्यंत पक्षांतर्गत राजकारण चांगलेच रंगत होते. परंतु आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नुकतेच भाजपात दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा कॉग्रेस राष्ट्रवादीला धक्का देत बाळासाहेब थोरतांच्या बालकिल्यात विखेंनी सुरुंग लावला … Read more

‘ईडी झालीय येडी!’ – सत्यजीत तांबे

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी। राज्यातील विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली असतानाच मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिखर बँक घोटाळाप्रकरणी कारवाई केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. यावर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘ईडी झालीय येडी!’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. सत्यजीत … Read more

लॉटरी.. एकाच उमेदवाराला दोन पक्षांकडून उमेदवारी जाहीर

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘तिकिटासाठी केवढी मारामार चालते’ हे नव्याने सांगण्याची गरज नाही. परंतु, जिथे एक तिकीट मिळायला कठीण तिथे एकाच उमेदवाराला एकाच विधानसभा मतदारसंघासाठी दोन-दोन पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर काय म्हणाल? होय, हे खरंय!! करवीर विधानसभा मतदारसंघातून डॉ. आनंद गुरव यांना दोन पक्षांकडून उमेदवारीची ही लॉटरी लागली आहे. काल ‘आप’ने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत डॉ. आनंद … Read more