गणपतराव देशमुख यांना पद्म पुरस्कार जाहीर करावा; विक्रम ढोणे यांची राज्य शासनाकडे शिफारशीची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांना समाजसेवेसाठी मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केली आहे. यासंदर्भाने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस करावी म्हणून त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. शेतकरी, कष्टकरी जनतेच्या उत्थानासाठी आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या गणपतराव देशमुख यांचे नुकतेच ३० जुलै … Read more

धनगर आरक्षणप्रश्नी मंत्री समिती स्थापन करा- विक्रम ढोणे

बारामती ः पाठीमागील देवेंद्र फडणवीस सरकारने एसटी आरक्षणप्रश्नी धनगर समाजाची घनघोर फसवणूक केली, त्याचप्रमाणे विद्यमान उद्धव ठाकरे सरकारही धनगर समाजाची उपेक्षा करत असल्याचा निषेध म्हणून गुरूवारी (ता. २९) धनगर विवेक जागृती अभियानाच्या वतीने बारामतीत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर आरक्षणप्रश्नी तातडीने कार्यवाही करण्यासाठी राज्य सरकारने मंत्री समिती स्थापन करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. धनगर … Read more

बारामतीत २९ जुलैला धनगर समाज विश्वासघात दिन-विक्रम ढोणे

बारामती : अनुसुचित जमातीच्या आरक्षणप्रश्नावरून धनगर समाजाचा सर्वात मोठा विश्वासघात भारतीय जनता पक्ष आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. फडणवीस यांनी २९ जुलै २०१४ रोजी बारामतीत धनगर समाजाला दिलेले आश्वासन पाळले नाही, उलट समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला. या कपटी राजकारणाचा निषेध करण्यासाठी २९ जुलै २०२१ रोजी धनगर समाज विश्वासघात दिन पाळणार असून त्याअंतर्गत … Read more

गोपीचंद पडळकर हा तर मोहरा; धनगर- मराठा दंगली पेटविण्याचा भाजपचा डाव- विक्रम ढोणे

महाराष्ट्रात भाजपचे सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या पाठीत खंजित खुपसलाच, शिवाय दलाल निर्माण करून समाजाचा बुद्धीभेद केला. भाजपची सत्ता गेल्यानंतर, दीड वर्षापासून महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी फडणवीस – चंद्रकांत पाटलांनी धनगर- मराठा दंगली घडविण्याचे कारस्थान रचले आहे. त्या कारस्थानाचा मोहरा म्हणून आमदार गोपीचंद पडळकर हे विष पसरवण्याचे काम करत आहेत. भाजपचे माजी मंत्री … Read more

ओबीसींनो, आता मोठ्या फसवणुकीला तयार राहा! फडणवीसांच्या आश्वासनावर विक्रम ढोणे यांची खरमरीत टीका

fadanvis vikram dhone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खोटे बोलण्यात कोणी हात धरू शकणार नाही. त्यांनी सात वर्षांपुर्वी धनगर समाजाला १५ दिवसांत अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात आरक्षण मिळणारच नाही, याची व्यवस्था केली, शिवाय बुद्धीभेद करून धनगर समाजाच्या राजकीय जागृतीची चळवळ संपवली. बहुजनद्वेषी फडणवीसांचा डोळा आता ओबीसी समाजावर आहे. त्यांनी ओबीसींच्या … Read more

भाजपच्या नौटंकीपासून चौंडीचे रक्षण करा ; धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांची मागणी

गत अठरा वर्षांपासून भारतीय जनता पक्ष धनगर समाजाला आरक्षणाच्या प्रश्नावरून फसवत आहे. वेगवेगळे नेते पुढे करून समाजाला संभ्रमित करण्याचा प्रकार सराईतपणे सुरू आहे. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी ३१ मे २०२१ रोजी त्यांचे जन्मगाव चोंडी (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथे आरक्षणाचा जागर् या नावाखाली भाजपच्यावतीने आंदोलनाची नौटंकी केली जाणार आहे. यावेळी चौंडीतील अहिल्यादेवींचे जन्मस्थान … Read more

पंढरपूरकरांनो भाजपच्या भाकडकथांना अजिबात बळी पडू नका; धनगर विवेक जागृतीकडून आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेतेमंडळी धनगर समाजाला भुलवण्यासाठी भाकडकथा सांगत आहेत. धनगर समाजातील दलाल पुढे करून एसटी आरक्षणासंबंधी पुर्णपणे खोटी माहिती दिली जात आहे. भाजपच्या या षढयंत्राला, तसेच इतर आमिषांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केले … Read more

चंद्रकांत पाटलांना लाजलज्जा आहे का? ‘या’ धनगर समाजाच्या नेत्याने केली सडकून टीका

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धनगर मतदारांना भुलवण्यासाठी शुद्ध थापा मारण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी ‘एसटी- बी’ प्रवर्ग केल्याचे पाटील सांगत आहेत. पाटील हे पराकोटीचे खोटे बोलत असल्याने त्यांना लाजलज्जा आहे कां, असा प्रश्न पडतो, अशी टीका धनगर विवेक जागृती … Read more

आरेवाडीच्या बिरोबाला फसवलेले पडळकर आता विठ्ठलाला फसवायला आलेत: विक्रम ढोणे

पंढरपूर । दोन वर्षापुर्वी आरेवाडी येथील बिरोबाच्या बनात धनगर आरक्षणप्रश्नी खोट्या शपथा घेतलेले गोपीचंद पडळकर यांनी आता नव्याने फसवणुकीचा डाव मांडला आहे. विठ्ठलाच्या नावाने धनगर समाजाची फसवणूक करण्यासाठी ते पंढरपुरात आंदोलन करत आहेत. विठ्ठल मंदिरात ढोल बजाओ आंदोलन करणाऱ्या पडळकरांनी स्वत:च्या स्वार्थासाठी धनगर आरक्षणाचा ढोल कधीच फोडला आहे. त्यामुळे पडळकरांच्या भाजपप्रणित एजेंड्यापासून धनगर समाजाने सतर्क … Read more

गद्दारी लपून राहावी यासाठीच गोपीचंद पडळकरांकडून भडक वक्तव्ये: विक्रम ढोणे

बारामती| गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणप्रश्नी मॅनेज होवून, तसेच उच्च न्यायालयातील एफिडेव्हिटसंबंधी खोटी माहिती देवून समाजाशी गद्दारी केली आहे. त्या गद्दारीची चर्चा होवू नये म्हणून पडळकरांनी भडक वक्तव्ये सुरू केली आहेत, अशी टीका धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. धनगर आरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या व्होट बँक … Read more