विराटबरोबर क्रिकेट खेळताना दिसली अनुष्का शर्मा, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हे दोघेही सोशल मीडियावर सतत त्यांच्या चाहत्यांशी जोडलेले असतात. आता दोघांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये विराट आपली पत्नी अनुष्कासोबत क्रिकेटचा सराव करत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. Finally after … Read more

ट्रम्प यांच्या स्वागतावर १२० करोड खर्च केल्यानंतर देशाला मिळाले २० करोडचे व्हेंटिलेटर; ‘या’ महिला खासदाराचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेकडून भारताला व्हेंटिलेटर गिफ्ट देण्याच्या प्रकरणावर टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांवर थेट हल्ला चढवत महुआ मोइत्रा यांनी ट्वीट केले की,”मोदीजी, ट्रम्प यांच्यासाठी पार्टिचे आयोजन करण्यात सरकारचा वेळ आणि पैश्याचा दुरुपयोग करण्याऐवजी आपण वेळीच कोरोनाचा धोका लक्षात घेतला असता तर कदाचित आपल्याला त्यांच्या या … Read more

कोरोना संकटात १६ मे ला अम्फान चक्रिवादळाचे संकट; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सुचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हवामान खात्याने १६ मे रोजी संध्याकाळी नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तविला आहे. आयएमडीने म्हटले आहे की दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे. त्यामुळे पुढील १२ तासांत ते ऍक्टिव्ह बनेल, म्हणूनच १६ मे रोजी संध्याकाळी ते चक्रीवादळात बदलण्याची शक्यता आहे. थायलंडने दिलेल्या या वादळाचे … Read more

काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही – शाहिद आफ्रिदीचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही, सेव काश्मीर अस ट्विट पाकिस्तान संघाचा खेळाडु शाहिद आफ्रिदीने केलं आहे. शाहिद आफ्रिदीने काश्मीरबाबत असे अनेक ट्विट केले आहेत. तो सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतो. सध्या जगावर कोरोनाचे संकट असल्याने तो त्याच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांच्या उपयोगाला येत आहे. त्याने उपासमारीची … Read more

जमिनीवर झोपले होते रुग्ण; भाजपच्या राम कदमांनी शेयर केला व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील किंग एडवर्ड मेमोरियल या हॉस्पिटलचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शुक्रवारी सकाळी काही रुग्ण जमिनीवरच झोपी गेलेले दिसत आहेत. भाजपचे नेते राम कदम यांनी आपल्या अधिकृत ट्विटद्वारे हा व्हिडिओ शेअर केला आहे. या रूग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेडच उपलब्ध नव्हते, त्यामुळे त्यांना जमिनीवरच झोपावे लागले, असा आरोप या भाजप … Read more

सुटकेसवर झोपलेला चिमुकला; आई दोरीने ओढल कापत होती गावचा रस्ता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सध्या देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये दुसऱ्या राज्यांमध्ये अडकलेले अनेक कामगार आपल्या घरी परतत आहेत. हे कामगार आणि त्यांच्या कुटुंबांची अनेक मार्मिक छायाचित्रे आता सोशल मीडियातून समोर येत आहेत. कधी कुठेतरी ते बैलांसह बैलगाडीमध्ये आपल्या कुटुंबाला खेचत आहे, तर कुठे ते पेंढींसारखे सिमेंट मिक्सिंग ट्रकमध्ये बसून त्यांच्या गावाकडे निघालेले … Read more

अमिताभ, आयुष्मानचा ‘गुलाबो-सीताबो’ चित्रपट १२ जूनला होणार डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या साथीमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सम्पूर्ण सिने सृष्टी बंद झाली आहे. देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे बऱ्याच चित्रपटांचे प्रदर्शनदेखील थांबले आहे. अशावेळी लॉकडाऊन संपण्याची काही चिन्हेही दिसेनात त्यामुळेच काही चित्रपट निर्माते आता आपले चित्रपट हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार करीत आहेत. नुकतेच अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना अभिनित चित्रपट ‘गुलाबो-सीताबो’ … Read more

पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या आवाहनावर शशी थरुर म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलेल्या भाषणात स्वदेशी वस्तुंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्तर देताना त्यांनी तेच जुने शेर नव्या नावाने पुन्हा विकले असे,म्हंटले आहे . यासंदर्भात शशी थरूर यांनी एक ट्विट केले आहे, ज्यात त्याने एक ग्राफिक शेअर … Read more

अफगाणिस्तानात मॅटरनिटी हॉस्पिटलवर दहशतवादी हल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानात मॅटरनिटी हॉस्पिटलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात १३ जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात महिला आणि मुलेही ठार झाली आहेत. हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केल्याचे सांगण्यात येते आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या महिला आणि लहान मुलांवरही यावेळी हल्ले झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन नवजात … Read more

मोदींचं भाषण ऐकून नेहमीच प्रेरणा मिळते; ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने मानले पंतप्रधानांचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधत २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण ऐकून बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना करोनाशी लढण्याची प्रेरणा मिळाली. या प्रेरणादायी भाषणासाठी अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. जब भारत के प्रधानमंत्री @narendramodi बोलते … Read more