Wednesday, June 7, 2023

मोदींचं भाषण ऐकून नेहमीच प्रेरणा मिळते; ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने मानले पंतप्रधानांचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधत २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण ऐकून बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना करोनाशी लढण्याची प्रेरणा मिळाली. या प्रेरणादायी भाषणासाठी अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

 

“नरेंद्र मोदी जेव्हा बोलतात तेव्हा देशच नाही तर संपूर्ण जगही त्यांचे भाषण ऐकण्यासाठी सज्ज होतं. त्यांच्या भाषणातून आम्हांला नेहमीच प्रेरणा मिळते. जेव्हा १३० कोटी भारतीय आत्मनिर्भरतेचं भांडवल घेऊन एकत्र येतील तेव्हा सम्पूर्ण जगात आपल्या कोणीही थांबवू शकणार नाही. आपल्याला निश्चितच यश मिळेल. २०,००,००० कोटी असे दिसतात. २०००००००००००००! गणित तर ठिक आहे ना?” अशा आशयाचं ट्विट अनुपम खेर यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्विटही सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाशी लढण्यासाठी २० लाख कोटीं रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. यावेळी देशातील सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज त्यांनी दिले आहे. देशासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या शेतकरी, मजुर तसेच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी हे पॅकेज आहे असंही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.