“पुतीन यांच्याकडून माझ्या हत्येचे आदेश”; वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशिया आणि युक्रेन यांच्यात मोठ्या प्रमाणात युद्ध सुरु आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत सैन्यासह अनेक युक्रेनियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे युक्रेन देखील रशियाला चोख प्रतित्युत्तर देताना दिसून येत आहे. दरम्यान युक्रेन- रशिया युद्धावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्म्हमहत्वाची बैठक बोलवली असून यात नाटो आणि युरोपियन देश सहभागी होणार … Read more

50 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी कारवाई सुरू करत पुढील 13 दिवसांत भारतीय सैन्याने केले होते पाकिस्तानचे दोन तुकडे

भारत-पाकिस्तान युद्ध 1971 | पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती अत्यंत खराब होत चालली होती. दररोज हजारो निर्वासित लोकं सीमा ओलांडून भारतात येत होते. ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढू लागला. 03 डिसेंबरच्या संध्याकाळी जेव्हा पाकिस्तानने भारताच्या हवाई पट्टीवर विमानांनी हल्ला केला, तेव्हा भारताने त्यांच्याविरोधात युद्ध घोषित केले. त्यानंतर पुढील 13 दिवसात भारताने ही लढाई नुसती जिंकलीच नाही … Read more

फ्रान्समधून भारतात पोहचली राफेलची 5 वी खेप; जाणून घ्या काय आहे विशेष

Rafel

नवी दिल्ली । राफेल लढाऊ विमानांची पाचवी खेप फ्रान्समधून भारतात पोहोचली आहे. या खेपेमध्ये चार राफेल लढाऊ विमान आहेत. बुधवारी सकाळी फ्रान्सच्या मेरिनाक-बोर्डू एयरबेस येथून हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदोरिया यांनी हे जहाज पाठविले. वायुसेनेच्या म्हणण्यानुसार ही चार विमाने 8000 किलोमीटर नॉन-स्टॉप उड्डाण करून भारतात पोहोचली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही विमान गुजरातच्या जामनगर एअरबेसवर पोहोचली … Read more

चीनने सीमेवर तैनात केले रॉकेट सिस्टिम! लांब पल्ल्यापर्यंत मारा करण्याची क्षमता; भारतासाठी चिंतेची बाब

बीजिंग । भारताशी झालेल्या तणावाच्या परिस्थितीत चीनने भारतीय सीमेजवळ लांब पल्ल्याची प्राणघातक रॉकेट सिस्टम तैनात केली आहे. चीनच्या लष्कराच्या पीएलएने हिमालयात लांब पल्ल्याचे रॉकेट लाँचर तैनात केले आहे. चिनी वृत्तपत्र दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टने लिहिले आहे की, पीएलएने सीमेवर रॉकेट सिस्टम तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताकडून येणारा ताण कमी होणार आहे. पीएलएने प्रथमच … Read more

भारताकडून चीनला पुन्हा एकदा मोठा झटका; शेकडो कोटींचं ‘हे” कंत्राट केलं रद्द

नवी दिल्ली | भारत आणि चीन यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत चीन सीमेवर झालेल्या धुमश्चक्रीचे रूपांतर युद्धात होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यावेळी झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शाहिद झाले होते. तर चीनचे त्यावेळी ४३ जवान मारले गेले होते. त्यानंतर भारताने चीनला दणका देत चीनच्या ५९ नवीन अँप … Read more

अमेरिका करणार चीनवर मोठी कारवाई, १५ दिवसांत घेतले ‘हे’ नऊ महत्वाचे निर्णय 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या फैलावामुळे चीन सध्या जगाच्या निशाण्यावर आहे. जगभरात हा विषाणू चीनने पसरवला असल्याचे बोलले जात आहे. भारत चीन सीमेच्या तणावातही अमेरिका भारताच्या बाजूने असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते. सध्या महासत्ता अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर वाढते आहे असे म्हंटले जाते आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच चीनविरोधात … Read more

मोदींनी हॉस्पिटलला भेट दिली की नाही? लष्कराने केला खुलासा 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी लेह लडाख मध्ये गेले होते. सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली. तुमच्या शौर्याची जाण संपूर्ण देशाला आहे हा विश्वासही त्यांना आपल्या शब्दांमधून दिला. इतकंच नाही तर गलवान खोऱ्यात जे सैनिक जखमी झाले त्यांचीही त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली. त्यांचे हे फोटो प्रसारित झाल्यावर सोशल मीडियावर हे … Read more

भारतीय जवानांवर हल्ला करण्याचे चीन सैन्याला होते पूर्वादेश – अमेरिकी गुप्तचर यंत्रणा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय बिहार १६ रेजिमेंटचे सैनिक आणि चीनी सैनिक यांच्यात एका चौकीवरून चकमक झाली होती. यामध्ये भारताचे २० जवान शहिद झाले. ज्यात कमांडर ऑफिसर संतोष बाबू यांचा समावेश होता. आता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने चीनला भारतीय जवानांवर हल्ला करण्याचे पूर्वादेश होते अशी माहिती दिली आहे. भारत चीन सीमेवर झालेल्या … Read more

काश्मीर खोऱ्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा मात्र महाराष्ट्र पुत्राला वीरमरण

वृत्तसंस्था | काश्मीर खोऱ्यातील पुलवामाच्या बंडजू भागात सुरु असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र त्यात एक भारतीय जवान शाहिद झाला आहे. सुनिल काळे अस या शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे. दरम्यान आज पहाटे साडेचार वाजता पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगांवचे सीआरपीएफ जवान सुनिल काळे हे शहीद झाले आहेत. … Read more

भारतीय सीमेत चिनी सैनिकांची घुसखोरी नाही – PM मोदी

नवी दिल्ली । भारताचे जवान एखाद्या पर्वताप्रमाणे देशाच्या सीमांचं रक्षण करत आहेत. लडाखमध्ये आपल्या देशाच्या सीमारेषेचं उल्लंघन करुन कुणीही घुसखोरी केलेली नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपले लष्कर, जवान हे देशाची रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रहित हेच आपल्या सगळ्याचं लक्ष आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर त्यांनी देशाशी … Read more