नवाब मलिकांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करा; समीर वानखेडे यांच्या नातेवाईकांचे मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अर्ज

0
106
sameer wankhede
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच राज्याचे मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपांचे प्रकरण आता औरंगाबाद येथे येऊन पोहोचले आहे. समीर वानखेडे यांच्या हत्या गुंफाबाई भालेराव यांनी नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या जातीवर टिप्पणी केल्याने आमची समाजात नातेवाईकांमध्ये बदनामी होत असून प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मलिक यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी आज मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करून केली.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात मंत्री नवाब मलिक हे सातत्याने आरोप करत आहेत. समीर यांचे जात प्रमाणपत्र बोगस असून त्यांनी एका मागासवर्गीयांचा हक्क हिसकावला असल्याचा आरोप मलिक यांनी केला. या आरोपामुळे वानखेडे यांच्या नातेवाईकांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार औरंगाबाद येथील समीर वानखेडे यांच्या हत्या गुंफाबाई भालेराव यांनी केली आहे. त्यांनी आज मुकुंदवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जातील तक्रारीनुसार मन्त्री मल्लिक यांनी समीर वानखेडे यांचे जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप केल्याने आमची समाजात बदनामी होत आहे. नातेवाईक तुम्ही मुस्लिम आहात का असे विचारत आहेत. मुली मुलांचा विवाह चे प्रश्न निर्माण होत आहेत. समीर वानखेडे मागासवर्गीय असल्यानेच मंत्री मलिक सातत्याने खोटी माहिती जाणीवपूर्वक प्रसारित करत आहेत. या प्रकारामुळे माझ्या सहकुटुंब यातील सर्व मानसिक तणावात आहे. जातीवादी व्यक्तव्य केल्यामुळे मलिक यांच्यावर ॲट्रॉसिटी कायदा नुसार कारवाई करावी असेही त्यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी मुकुंदवाडी येथे एका कार्यक्रमात गुंफाबाई तसेच प्रमोद भालेराव सोबत समीर वानखेडे तसेच ज्ञानदेव वानखेडे यांच्यासह कुटुंबात एकत्र बसलेला फोटो दाखवून नातेवाईक असल्याचे स्पष्ट केले. मुकुंदवाडी परिसरात रेल्वे पटरी पलीकडे झोपडपट्टीत राहणाऱ्या गुंफाबाई व त्यांचा मुलगा प्रमोद भालेराव यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. चौकशी करून त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here