Aadhaar Seva Kendra: आपले आधार कार्ड अपडेट करण्यासाठी घ्या ऑनलाइन अपॉईंटमेंट, आता वेळेची बचत आणि कामही सहज पूर्ण होईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आधार देणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) सर्व प्रकारच्या आधार सेवांसाठी ‘आधार सेवा केंद्र’ (ASK – Aadhaar Seva Kendra) उघडले आहे. या आधार सेवा केंद्राला भेट दिल्यास कोणताही नागरिक थेट त्यांच्या आधारशी संबंधित कोणत्याही सेवेचा लाभ घेऊ शकतो. या आधार सेवा केंद्रांवर आधार एनरोलमेंटसह, अपडेशनचे देखील काम केले जाते.

आधार सेवा केंद्र आठवड्यातील प्रत्येक दिवशी सकाळी 9.30 ते संध्याकाळी साडेचार या वेळेत खुले असेल. आपणास आपल्या आधारमधील कोणतीही माहिती अपडेट करायची असल्यास किंवा इतर कोणत्याही सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर आपण आधार केंद्रात जाऊन ते पूर्ण करू शकता.

> आधार सेवा केंद्रावर तुम्हाला आधार एनरोलमेंट मिळू शकेल.

> आपल्या जुन्या आधार कार्डमध्ये आपण नाव, पत्ता, लिंग, जन्म तारीख, मोबाइल नंबर, ईमेल यासारखी माहिती अपडेट करू शकता.

> फोटो, फिंगरप्रिंट्स आणि डोळ्यांचे स्कॅनिंग यासारखी बायोमेट्रिक माहिती आधार सेवा केंद्रात अपडेट करता येऊ शकते.

> येथे आधार डाउनलोड किंवा प्रिंटही येते.

तुम्ही आधार सेवा केंद्रासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटदेखील बुक करू शकता. चला तर मग त्याची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊयात.

> यासाठी आपल्याला पहिले UIDAI च्या वेबसाइटवर जावे लागेल आणि My Aadhaar वर क्लिक करावे लागेल.

> त्यानंतर दुसर्‍या टस्टेपमध्ये तुम्हाला ड्रॉप डाऊन मेनूवर जाऊन Book an Appointment वर क्लिक करावे लागेल.

> यानंतरच्या टस्टेपमध्ये आपल्याला आपल्या शहर किंवा लोकेशनबद्दलची माहिती द्यावी लागेल.

> यानंतर आपण आपल्या गरजेनुसार आणि कामानुसार ‘New Aadhaar’, ‘Aadhaar Update’ किंवा ‘Manage Appointment’ यापैकी एक पर्याय निवडा.

> समजा जर तुम्ही आधार अपडेट करणे निवडले असेल, तर त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर द्यावा लागेल. या मोबाइल नंबरवर व टाईम पासवर्ड पाठविला जाईल.

> एकदा ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यास आपण तारीख आणि टाईम स्लॉट निवडू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.