हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाचा प्रश्न आघाडी सरकारकडून सोडवला जात नसल्याने भाजपकडून जोरदार टीका करीत हल्लाबोल केला जात आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आघाडी सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रश्नी आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहले असून मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीनं सोडवावा व या समाजातील शिक्षणात १२ टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्राद्वारे विनंती केली आहे कि, मराठा समाजातील बांधवाना त्यांच्या आरक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला आहे. मात्र तो सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. राज्याला अशा पढणे कायदा तयार करून आरक्षण देण्याचा अधिकार नाही, असे मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करताना न्यायालयानं म्हंटल आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे आज केंद्रातील मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून राज्याला मराठा आरक्षण देता येणे शक्य आहे. ते देण्यात यावे आणि त्यासाठी आवश्यक असणारी पावलेही उचलावीत. याचबरोबर मराठा समाजातील मुलांच्या शिक्षणात १२ टक्के आणि सरकारी नोकरीत १३ टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी कयोग्य ती कार्यवाही करावी, अशी विंनती यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्र देण्याअगोदर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री वड्डेटीवार यांनी राज्य सरकार मराठा समाजबांधवांना आरक्षण मिळवून देणार आहे. त्यांना त्यांचा आरक्षणाचा हक्क मिळावा म्हणून सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असून यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्तीही करण्यात आली असल्याची माहिती दिली होती. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून अगोदरच आघाडी सरकारला विरोधकांकडून धरेवर धरले जात आहे. अशा परिस्थितीत आता राज्य सरकारकडूनही मराठा समाजबांधवांच्या न्यायासाठी प्रयत्न केले जात असल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in