पित्ताचा त्रास टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । व्य जास्त झाले कि अनेक लोकांना पित्ताचा त्रास जाणवायला सुरुवात होते. पित्त झाले कि, कोणत्याही प्रकारचे पदार्थ खाऊ वाटत नाहीत. पित्त न होण्यासाठी काही प्रमाणात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. तसेच भूक जरी नसेल तरी खाण्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा अतिरेक असता कामा नये. जेवढे आपल्या शरीराला गरजचे आहे.तेवढेच खाणे फायदेशीर ठरत आहे. भूक नसल्यास विनाकारण खाणं टाळा. तसेच आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करू शकता जाणून घेऊया..

आहारात ताजी फळे, भाज्या आणि अन्नधान्याचा समावेश करा

भरपूर पाणी प्या

सोयाबीन, डाळी अशा फायबरयुक्त पदार्थ खा

कंटाळवाणेपणा किंवा एकाकीपणामुळे खाणे टाळा

जंकफुड किंवा उघड्यावरील मसालेदार पदार्थांचे सेवन टाळावेत

न खाल्ल्याने झोप लागत नसल्यास स्वतःचे मन वळवण्याचा प्रयत्न करा.

झोपेपूर्वी टीव्ही पाहणे, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स वापरणं किंवा कँफिनेटेड पेय पिणं.

नियमित व्यायाम करा. कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करा. पोहणे, नृत्य, योगा, धावणं, एरोबिक्स किंवा जॉगिंग असे काहीही करा जेणेकरून शरीराची हालचाल होऊ शकते.

आपल्या जेवणात निरोगी घटकांचा समावेश असल्याचे सुनिश्चित करा.

खाल्ल्यानंतर लगेचच अंथरूणात झोपणं टाळा

मद्यपान आणि धूम्रपान यांसारख्या व्यसनापासून दूर रहा

कांद्याचा रस किंवा टोमॅटोचा रस पिऊ नका किंवा कच्चा कांदा देखील खाऊ नका.

जेवणाच्या वेळा निश्चित करा, रात्रीअपरात्री खाण्याची सवय टाळा

अँसिडिटीचं वेळीच निदान न झाल्यास…या समस्या उद्भवू शकतात

अन्ननलिकेला सूज
अन्ननलिकेच्या भिंतीवर जखमा, अल्सर,
अन्ननलिकेचे तोंड आकुंचन पावणे.
अन्ननलिकेचा कॅन्सर.
रक्तक्षय
या कारणास्तव अपचन किंवा अँसिडिटीचा त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घेणं आवश्यक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment