औरंगाबाद : खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद सातबारा मध्ये करण्यासाठी तलाठ्याने चार हजारांची मागणी करून तडजोडीअंती तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने देवळाई येथील तलाठ्यास रंगेहात अटक केली आहे.भरत दत्तू दुतोंडे असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
एसीबी कार्यालयाकडून प्राप्त झालेली अधिक माहिती अशी की, देवळाई बीड बायपास भागात तक्रारदाराने नवीन प्लॉट खरेदी केला होता. त्या प्लॉटची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदाराने देवळाई येथील तलाठी कार्यालयात अनेक चकरा मारल्या मात्र त्यांचे काम होत नसल्याने त्यांनी तलाठी दुतोंडे यांची भेट घेतली असता त्यावेळी दुतोंडे यांनी सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी चार हजार रुपये लाचेची मागणी केली.…
पथकाने आज कार्यालयात सापळा रचला असता तडजोडी अंती दुतोंडे यांनी तीन हजार रुपये स्वीकारले. तक्रारदाराने इशारा करताच पथकाने दुतोंडे यांना ताब्यात घेतले या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अधीक्षक डॉ. राहुल खाडे,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार,उप अधीक्षक बी.व्ही.गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, अरुण उगले, दिगंबर पाठक, केवलसिंग घुसिंगे, चांगदेव बागून यांच्या पथकाने केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा