काबूल । अफगाणिस्तानातील अनेक भाग ताब्यात घेतल्यानंतर तालिबान आता लोकांकडून टॅक्स वसूल करीत आहे. स्पिन बोल्डक (Spin Bodlak) ताब्यात घेणार्या तालिबान्यांनी मंगळवारी नवीन टॅक्स लावला. तालिबानी लढाऊ सैनिकांनी टोल प्लाझासारखे चेकपॉईंट्स उभारले आहेत आणि ते येण्याजाणाऱ्यांकडून टॅक्स वसूल करत आहेत.
हे अशा वेळी सुरु झाले आहे जेव्हा दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीच्या निलंबना नंतर पाकिस्तानने एक दिवस आधीच व्यापारा साठी आपली सीमा पुन्हा उघडली. अफगाणिस्तानच्या जॉइंट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (PAJCCI) उपाध्यक्ष इम्रान खान कक्कर यांनी पाकिस्तानी वेबसाइट डॉनला सांगितले की, “तालिबानने 20 पानांचे एक टॅक्स डॉक्युमेंट्स जारी केले असून पाकिस्तानमध्ये देण्यात येणार्या विविध वस्तूंवरील टॅक्सचा देखील उल्लेख केला गेला आहे.”
त्यात म्हटले आहे की, तालिबानी अधिकाऱ्यांना टॅक्स कसा मिळतो आणि प्रत्येक आयात-निर्यातीवर त्यांनीच ठरवले आहे. 90 टक्के क्षेत्र ताब्यात घेतल्याचा दावा करणाऱ्या तालिबानचा रक्तरंजित खेळ अजूनही सुरूच आहे. यापूर्वी तालिबानी दहशतवाद्यांनी गझनीत 43 लोकांचा बळी घेतला होता.
भीषण तालिबानी हल्ल्याच्या भीतीने, हजारो नागरिकं आपली घरे सोडून काबूल येथे गेले आहेत, जे सध्या सरकारी सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे. तालिबानचा धोका लक्षात घेता अफगाण सरकारने अनेक भागात नाईट कर्फ्यू लावला आहे.