तालिबान कडून आता तुर्कीला धमकी -“अफगाणिस्तान सोडा अन्यथा …”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल । अफगाणिस्तान पुन्हा एकदा तालिबानच्या क्रूर राजवटीकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. तालिबानी सैनिक अफगाण सैनिकांना निर्दयपणे गोळ्या घालून ठार मारत आहेत. अफगाणिस्तानातील 85 टक्के प्रदेश ताब्यात घेतल्याचा दावाही तालिबान्यांनी केला आहे. आता तालिबान्यांनी तुर्कीला धमकी देत ​​असे म्हटले आहे की,” नाटोचा सदस्य म्हणून त्याने अफगाणिस्तान पूर्णपणे सोडले पाहिजे.”

तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान यांना धक्का देताना तालिबान्यांनी काबुल विमानतळावर पहारेकरी असलेल्या तुर्कीच्या सैन्याला मागे घेण्यास सांगितले आहे. अफगाणिस्तानात नॉन-लढाऊ नाटो मिशनचा भाग म्हणून तुर्कीचे 500 हून अधिक सैनिक आहेत. त्यातील काही सैनिक सुरक्षा दलांना प्रशिक्षण देत आहेत तर काही हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात आहे.

तालिबानचे प्रवक्ते झाबीउल्लाह मुजाहिद म्हणाले की,” तुर्की गेली 20 वर्षे नाटोसमवेत अफगाणिस्तानात आहे. जर त्यांना अजूनही रहायचे असेल तर यात शंका नाही कि याला आम्ही ताबा घेतल्याप्रमाणे मानू आणि याविरोधात मोठी कारवाई करु.” लष्करी तसेच नागरी उड्डाणांसाठी आणि अफगाणिस्तानात आंतरराष्ट्रीय मदत गट आणि मुत्सद्दी लोकांच्या सुरक्षित प्रवेशासाठी विमानतळाची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. अशातच जर तुर्कीने विमानतळावरून आपले सैन्य मागे घेतले तर नागरिक आणि मुत्सद्दी लोकं यांच्यासाठी तो मोठा धोका ठरेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment