एकटी मुलगी पाहून घरात शिरला अन्…; 3 तासांनी आरोपीनं गळफास घेत संपवलं जीवन

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील एका तरुणाने मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे. यावेळी मुलीने आरोपीला विरोध करत घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केल्याने आरोपीने पीडित मुलीला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली आहे. मुलीला मारहाण केल्यानंतर घाबरलेल्या तरुणानं घटनेच्या तीन तासानंतर गळफास घेऊन स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव पवन तान्हाजी दांगट असे आहे. मागील काही दिवसांपासून तो गावातील एका मुलीवर प्रेम करत होता. पण ती मुलगी त्याला थोडापण भाव देत नव्हती. त्यामुळे आरोपी पवन 11 जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास पीडित मुलीच्या घरात कुणी नसल्याचे पाहून तिच्या घरात शिरला. घरात घुसून हा आरोपी तिच्या अंगाला झटू लागला. ‘मी किती दिवसांपासून तुझा पाठलाग करतोय, तरीही तू मला भाव देत नाही’ असे म्हणत आरोपीने पीडित मुलीचा हाथ पकडला.

यानंतर आरोपीने पीडित मुलीशी जबरदस्ती करायला सुरुवात केली. त्यामुळे तिने आरोपीच्या तावडीतून सुटका करून घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या पवनने पीडितेच्या घरातील कुऱ्हाडीच्या दांड्याने पीडितेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेत पीडित मुलगी गंभीर जखमी झाली. हि मुलगी जखमी झाल्याचे पाहून आरोपी पवन घाबरून गेला. यानंतर त्याने तीन तासानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. मुलीच्या फिर्यादीवरून मंठा पोलिसांनी मृत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नाईक राठोड करत आहेत. गावातील एका मुलीला कुऱ्हाडीच्या दांड्यानं मारहाण करून तरुणाने आत्महत्या केल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे.

You might also like