काबूल । अफगाणिस्तानात ताबा मिळाल्यानंतर तालिबानने तिथे आपले सरकारही स्थापन केले आहे. आता तालिबानचे नेतेही उघड्यावर येत आहेत. नुकतेच तालिबानचा मुख्य प्रवक्ता जबीउल्ला मुजाहिदने एका मुलाखतीत सांगितले की,”काबुलमध्ये अमेरिकन सैन्याच्या मुक्कामाच्या काळातही तो दहशतवादी योजना राबवत असे.”
जबीउल्ला मुजाहिद म्हणाला,”काबूलमध्ये मी अमेरिकन आणि अफगाण सैन्याच्या नाकाखाली माझे उपक्रम राबवत असे. मी केवळ काबूलमध्येच नाही तर देशाच्या इतर भागातही मुक्तपणे फिरायचो. तालिबानच्या कामामुळे मी जिथे जायचो तिथे अगदी सहजतेने जायचो.”
पाकिस्तानच्या वृत्तपत्र एक्स्प्रेस ट्रिब्यूनला दिलेल्या मुलाखतीत जबीउल्लाह मुजाहिदने सांगितले आहे की,” तो काबुलमध्ये अमेरिकन आणि अफगाण सैन्याभोवती राहत असताना अनेक वर्षांपासून आपले उपक्रम चालवत होता”. जबीउल्लाह म्हणाला, “काबूल ताब्यात घेतल्यानंतर गेल्या महिन्यात जेव्हा मी पत्रकार परिषद घ्यायला आलो होतो, तेव्हा मी अनेक लोकांसाठी पूर्णपणे नवीन व्यक्ती होतो. या पत्रकार परिषदेपूर्वी माझ्याबद्दल अनेक गोष्टी पसरल्या होत्या, अनेक लोकं म्हणायचे की, या नावाने तालिबानचा कोणी नेताच नाही. अमेरिकन लष्कराने असाही विचार केला की, जबीउल्ला मुजाहिद हे एक काल्पनिक पात्र होते, वास्तविक नाही. त्यांच्या या विश्वासामुळे मला काबूलमध्ये लपून राहण्यात फायदा झाला.”
अफगाणिस्तान मधून कधीही पळून गेलो नाही
हा 43 वर्षीय तालिबानी प्रवक्ता पुढे म्हणाला की,” त्याने अनेक देशांचा प्रवास केला आणि विविध कार्यक्रम आणि सेमिनारमध्ये भाग घेतला. मी अनेक वेळा पाकिस्तानतही गेलो, मात्र नंतर परत आलो आणि अफगाणिस्तानातच काम करू लागलो. मुजाहिद म्हणतो की,” त्याने कधीच फार काळ अफगाणिस्तान सोडले नाही किंवा त्याने येथून दूर राहण्याचा विचारही केला नाही.
नौशेराच्या हक्कानिया मदरशात प्रशिक्षण घेतले
जबीउल्लाह मुजाहिदने कबूल केले की, त्याने उत्तर -पश्चिम पाकिस्तानच्या नौशेरा येथील हक्कानिया मदरशात शिक्षण घेतले, ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर तालिबान विद्यापीठ किंवा ‘जिहाद विद्यापीठ’ म्हणूनही ओळखले जाते.