तमिळनाडू : वृत्तसंस्था – तमिळनाडूतील कोईम्बतूर या ठिकाणी एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये ड्युटीवर असताना एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलने फूड डिलिव्हरी बॉयला जबर मारहाण (slapping food delivery boy) केली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल फूड डिलिव्हरी बॉयला कानाखाली मारताना (slapping food delivery boy) दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने या हवालदारावर कारवाई करत त्याची शहरातील पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली.
कॉन्स्टेबलची कंट्रोल रूममध्ये बदली
सिंगनल्लूर पोलीस ठाण्यातील ग्रेड-1 कॉन्स्टेबल सतीशने शुक्रवारी अविनाशी रोडवरील ट्रॅफिक जंक्शनवर डिलिव्हरी बॉयच्या कानशिलात (slapping food delivery boy) लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करत कॉन्स्टेबलची कंट्रोल रूममध्ये बदली केली.
ट्रॅफिक कॉन्स्टेबलची डिलिव्हरी बॉयला भररस्त्यात मारहाण, CCTV फुटेज आले समोर pic.twitter.com/NdokbxnlvQ
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 5, 2022
काय घडले नेमके ?
38 वर्षीय मोहनसुंदरम गेल्या दोन वर्षांपासून फूड एग्रीगेटर स्विगीसोबत डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करतात. त्यांनी सांगितलं की, शुक्रवारी संध्याकाळी एका खासगी शाळेच्या बस चालकाने भरधाव वेगात आणि बेदरकारपणे गाडी चालवली होती. वर्दळीच्या रस्त्यावरील एका मॉलजवळ बस दोन दुचाकींना आणि एका वाटसरूला धडकणार होती. त्यांनी चालकाला विचारणा केली असता काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
कॉन्स्टेबलनं फूड डिलिव्हरी मॅनला केली शिवीगाळ
कॉन्स्टेबलनं डिलिव्हरी बॉयला दोनदा शिवीगाळ आणि कानशिलात (slapping food delivery boy) मारताना, त्याचा मोबाइल फोन हिसकावून घेतला आणि बाईकचंही नुकसान केलं. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हे पण वाचा :
अशा प्रकारे गुंतवणूक करून 15 वर्षांत मिळवा 1.2 कोटी रुपये !!!
कोरोनाचं प्रमाण वाढतंय योग्य खबरदारी घ्या; केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पत्र
मुलाशी नाही तर स्वतःशीच लग्न करणार गुजरातची ‘ही’ मुलगी !!!
मी सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढणार; गोपीनाथ गडावरून पंकजा मुडेंचे सूचक विधान
आता खरी वेळ सुरु झाली आहे ; अर्ज मागे घेण्याची वेळ संपताच संजय राऊतांचा भाजपला इशारा