तमिळनाडू : वृत्तसंस्था – सध्याची तरुण पिढी हि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. यामुळं त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात. सोशल मीडियावरची मैत्रीसुद्धा अनेक लोकांना महागात पडते. अशीच एक सोशल मीडियाशी संबंधित घटना तमिळनाडूतील दिंडीगुल या ठिकाणी घडली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या एका तरुणीने सतीश आणि अरुण या दोन तरुणांनी आपले अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याची तक्रार दिंडीगुलजवळच्या नीलकोट्टाई इथं असलेल्या पोलीस ठाण्यात दिली.
यानंतर पोलिसांनी या तरुणीच्या तक्रारीवरून सतीश, अरूण तसंच इतर दोघांविरुद्ध एफआयआर दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सतीश आणि नेल्सन यांना अटक केली असून अरुण आणि दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरु आहे. या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, ती नीलकोट्टाईजवळच्या एका गावात राहते. ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकते. तिचं आणि सतीश यांचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यामुळे तिने तिचे अश्लील फोटो सतीशला शेअर केले होते.पण कोरोनाकाळात लॉकडाऊन लागला आणि या दोघांमधला संपर्क कमी झाला. त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला.
त्याचवेळी या मुलीचे सोशल मीडियावर अरुण नावाच्या मुलाशी सूत जुळलं. तिला तो आवडायला लागला म्हणून या मुलीने तिचे अश्लील फोटो अरुणलासुद्धा पाठवले. याचदरम्यान अरुण आणि सतीश यांची भेट झाली आणि त्यांच्या लक्षात आलं की ही मुलगी दोघांशीही प्रेमाचं नाटक करत आहे. त्यामुळे त्या तिघांमध्ये खटके उडायला लागले. त्या रागातून सतीश आणि अरुण यांनी त्यांच्याकडे असलेले या मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आणि ते व्हायरल केले. या तरुणीला जेव्हा समजले कि तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.