हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात झाला आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला असून पुणे-सोलापूर महामार्गावर हि घटना घडली. सुदैवाने या अपघातात तानाजी सावंत यांच्यासह कुणालाही दुखापत झालेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे दोन दिवस आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. उस्मानाबादहून ते पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड येथे त्यांची रात्रीच्या सुमारास गाडी आली असता अपघात झाला.
आमदार तानाजी सावंत यांनी दोन महिन्यांपूर्वी जाहीर कार्यक्रमात आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली होती. निधी वाटपावरुनही तानाजी सावंत यांनी शिवसेनेला दुय्यम वागणूक दिल्याचे म्हंटले होते. दरम्यान तानाजी सावंत हे नाराज असून भाजपत प्रवेश करण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे सावंत यांनी सांगतले होते.