तन्मय फडणवीस यांना लस कोणत्या पात्रतेमध्ये दिली गेली? नेटकर्यांचा सामाजिक माध्यमांवर प्रश्न

Tanmay Fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर | करोणा महामारीमध्ये दुसरी लाट ही भयंकर मोठ्या प्रमाणात लोकांना प्रभावित करत असताना दुसरीकडे लसीकरणाचा वेग वाढताना दिसत नाही. यामध्ये पंचेचाळीस वर्षे वयाच्या पेक्षा जास्त नागरिकांना आणि करोनामध्ये फ्रन्टलाइन वर्कर लोकांना ही लस प्राथमिकतेने दिले जाते. पण काही लोक हीलस आपले राजकीय बळ वापरून पात्रतेत बसत नसतानाही घेतात की काय? असा सवाल आता सामाजिक माध्यमावरती विचारला जात आहे. त्याला कारण आहेत, देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस!

देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आणि त्याचा फोटो सामाजिक माध्यमांवरती शेअर केला. पण नेटकर्यांकडून होत असलेल्या टीकेवर आणि विचारल्या गेलेल्या प्रश्नांनंतर त्यांनी आपले फोटो सामाजिक माध्यमावरून काढून टाकले. त्यामुळे आपले चुलते महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रबळ राजकीय नेतृत्व असल्यामुळे त्यांना लसीकरणाची सोय उपलब्ध झाली का? असा सवाल समाजातून विचारला जात आहे.

या प्रकरणावर बोलताना विधानपरिषदेचे आमदार व शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे. त्या हॅलो महाराष्ट्र सोबत बोलताना म्हणाल्या की, ‘देवेंद्र फडणीस यांची प्रतिमा दिवसेंदिवस डागाळली जात आहे. आपल्या पदाचा वापर हा कुटुंबाच्या फायद्यासाठी करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. मागील काही प्रकरणे विसरले नसतानाच, आता हे नवीन प्रकरण समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी डोळ्यात धूळ टाकली आहे. हा जनतेचा विश्वासघात आहे. त्यांचे वय लासिकरणासाठी बसत नसताना. व इतर गरीब व गरजू रांगेत ताटकळत लसीची वाट बघत असताना त्यांना लस मिळाली कशी. देवेंद्र फडणवीस त्यांनी या प्रकरणाचे स्पष्टीकरण द्यावे’. सोबतच, या प्रकरणाचे तीव्र पडसाद सामाजिक माध्यमवरती पडताना दिसून येत आहेत.