सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर असल्यामुळे दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर मागील 2 दिवसात तीन ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत. त्यामुळे महाबळेश्वर- तापोळा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. प्रशासनाकडून दरडी हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात पावासाने मुसळधार हजेरी लावली. या अतिवृष्टीमुळे भूस्खलन, दरडी कोसळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर झाल्याचे उघडकीस आले आहे. महाबळेश्वर- तापोळा रस्त्यांवर चिखली, म्हारोळी, कापशी या 3 वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळली आहे. त्यामुळे महाबळेश्वर-तापोळा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
महाबळेश्वर पासून 35 किलोमीटर अंतरावर तापोळा हे गाव असून या मर्गावर अनेक गावे आहेत. या मार्गावर कोसळलेल्या दरडीमुळे संपर्क तुटलेले आहे. पावासाचे प्रमाण कमी झाल्याने प्रशासनाकडून जेसीबीच्या मदतीने दरड हटवण्याचे काम सुरु आहे. मात्र पश्चिम भागात असलेल्या पावसामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण होत आहे.
खालील लिंकवर क्लिक करून व्हिडिअो पहा. ????????????
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/180685877427934