तारापूर एमआयडीसीमधील नाईट्रेट कंपनीत भीषण स्फोट; मालकासह ८ जण ठार

मुंबई प्रतिनिधी । तारापूर एमआयडीसीमधील एम२ प्लॉटमधील तारा नाईट्रेट या नावाने ओळखली जाणाऱ्या कंपनीत संध्याकाळी ६.५० च्या सुमारास भीषण स्फोट झाला असून या अपघातांमध्ये कंपनीच्या मालकासह ८ कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. स्फोटाचा हादरा इतका मोठा होता की आसपासचा १० ते १५ कि.मी. चा परिसर हादरला.

एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत हा स्फोट झाला. स्फोटाचा कारण अद्याप कळू शकलेलं नाही. स्फोटामुळे लागलेली आग आसपासच्या दोन-तीन कंपन्यांपर्यंत पसरली आहे. मृतांमध्ये, कंपनीचे मालक नटुभाई पटेल यांचाही समावेश आहे. तारापूर गावातील कोलवडे गावात ही कंपनी आहे. कंपनीचं नाव ‘तारा नायट्रेट’ आहे. काही कामगार अद्याप इमारतीखाली दबले असल्याची माहिती आहे.

You might also like