Tata Blackbird SUV : Tata Motors लॉन्च करणार ब्लॅकबर्ड SUV; Hyundai Creta ला देणार थेट टक्कर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात (Tata Blackbird SUV) वेगवेगळ्या कंपन्या एकामागून एक नवनवीन गाड्या बाजारात लॉन्च करत आहेत. त्यातच आता प्रसिद्ध वाहन उतपदक कंपनी टाटा मोटर एक नवी SUV बनवण्याच्या तयारीत आहे. या कारचे नाव Tata Blackbird असं आहे. ही SUV सध्या विकल्या जात असलेल्या Tata Nexon SUV वर आधारित आहे . लॉन्च झाल्यानंतर ही SUV Hyundai Creta आणि Kia Seltos शी थेट स्पर्धा करेल. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या गाडीचे खास फीचर्स, डिझाईन आणि इंजिनबाबत …

लुक आणि डिझाईन –

रिपोर्ट्सनुसार, (Tata Blackbird SUV) टाटा मोटर्स आपली ब्लॅकबर्ड एसयूव्ही नव्या डिझाइन आणि कूप-स्टाईल रूफलाइनसह सादर करू शकते. गाडीच्या लूक बाबत बोलायचं झाल्यास, या SUV चा आकार 4.3 मीटरपेक्षा जास्त असेल. लांबी जास्त असल्यामुळे गाडीची केबिन आणि बूटस्पेस देखील उत्कृष्ट असेल. यामध्ये डीआरएलही पाहता येणार असून आकर्षक बंपरही मिळेल.

Tata Blackbird SUV

गाडीला इंजिन कोणतं ? (Tata Blackbird SUV)

Tata च्या या SUV मध्ये कंपनी 1.5-लिटर पेट्रोल इंजिन देऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, कंपनी काही काळापासून या इंजिनवर काम करत आहे, हे इंजिन सुमारे 160hp पॉवर जनरेट करेल. विशेष म्हणजे Nexon मधील 1.2-लिटर इंजिनपेक्षा हे इंजिन चांगले असेल. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध असेल.

Tata Blackbird SUV

अन्य वैशिष्ट्ये –

टाटा ब्लॅकबर्ड एसयूव्ही (Tata Blackbird SUV) मध्ये तुम्हाला वायरलेस चार्जर , वायफाय मिळेल. यामध्ये सनरूफ आणि ऑटोमैटिक हवामान नियंत्रण वैशिष्ट्ये देखील असतील. याशिवाय तुम्हाला कंपनीकडून रियर व्ह्यू कॅमेरा देखील उपलब्ध असेल.

Tata Blackbird SUV

किती असू शकते किंमत –

गाडीच्या किमतीबाबत बोलायचं झालयास रिपोर्ट्सनुसार, Tata Blackbird SUV ची किंमत जवळपास 11 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. ही किंमत एक्स-शोरूमनुसार असेल.

हे पण वाचा : 

Electric SUV : लवकरच बाजारात येणार देशी इलेक्ट्रिक SUV; एका चार्जवर 500 किमी धावणार

TATA Sumo : टाटाची सर्वाधिक विक्री झालेली 7 सीटर Sumo येतेय नव्या लूकमध्ये; पहा फिचर्स अन् किंमत

Tata Tiago EV : टाटा मोटर्सने लॉन्च केली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; पहा किंमत आणि फीचर्स

Maruti Suzuki Alto K10 : नवी Alto K10 बाजारात घालणार धुमाकूळ; पहा किंमत आणि फीचर्स

Maruti Suzuki Alto : मारुतीची Alto नव्या अवतारात येणार; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत