हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : टाटा ग्रुप मधील कंपनी असलेल्या TRF चे शेअर्स सोमवारी पुन्हा एकदा 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किट वर आले. आज या कंपनीचे शेअर्स 29 रुपयांनी वाढून 324 रुपयांवर पोहोचले. हे लक्षात घ्या कि, सलग 5 वे ट्रेडिंग सत्रात TRF च्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागले आहे. आज या शेअर्सने आपला सर्वकालीन उच्चांक गाठला आहे.
गेल्या 5 सत्रांमध्ये TRF च्या शेअर्सनी 60 टक्के रिटर्न दिला आहे. त्याच वेळी गेल्या एका महिन्यात यामध्ये 123 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र सतत अप्पर सर्किटमध्ये दिसत असल्याने यामध्ये नवीन खरेदी करण्याचा सल्ला दिला जाऊ शकत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, याबरोबरच ते असेही सांगत आहेत की, हे शेअर्स आजून 420 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतात. मात्र गुंतवणूकदारांनी यासाठी 300 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा. Multibagger Stock
तज्ञ काय सांगतात हे जाणून घ्या
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक असलेल्या सुमित बगाडिया यांनी सांगितले की,” या शेअर्समध्ये सध्या नवीन खरेदीचा सल्ला दिला जाऊ शकत नाही कारण तो सतत अप्पर सर्किटमध्ये आहे.” मात्र, गुंतवणूकदारांनी 300 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा, असेही त्यांनी सांगितले. तसेच अल्पावधीत 375 हे शेअर्स रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असा विश्वासही बगाडिया यांनी व्यक्त केला आहे. IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणतात की,” नवीन गुंतवणूकदारांनी जेव्हा त्यामध्ये घसरण होईल तेव्हा खरेदी करावी. तसेच त्यांनी खरेदीसाठी 290-300 रुपये दर योग्य असल्याचे म्हंटले आहे. त्याच वेळी, या स्टॉकला 385 रुपयांच्या जवळ डेडलॉक मिळू शकेल आणि जर स्टॉक येथून पुढे गेला तर तो 420 रुपयांपर्यंत जाऊ शकेल. असेही त्यांनी म्हंटले आहे. Multibagger Stock
TRF शेअर्सच्या किंमतीबाबत जाणून घ्या
हे लक्षात घ्या कि, TRF चा मल्टीबॅगर स्टॉक मध्ये समावेश होतो. यावर्षी आतापर्यंत हे शेअर्स 135 रुपयांवरून 324 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत या शेअर्सनी 135 टक्के रिटर्न दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 1 वर्षात या शेअर्सनी 170 टक्के रिटर्न दिला आहे. या शेअर्सचा 52 आठवड्यांचा नीचांक 106 रुपये आहे. या कंपनीची मार्केट कॅप 325 कोटी रुपये आहे. Multibagger Stock
कंपनीची आर्थिक स्थिती बाबत जाणून घ्या
चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीने 41 कोटी रुपयांची कमाई केली असून त्यांना 27 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. तर मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 16 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते तर 20 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीला 27 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनी मटेरियल हाताळण्यासाठी सिस्टीम आणि इक्विपमेंट्स तयार करते. कंपनीस्टील प्लांट, पोर्ट्स, फर्टिलायझर आणि मायनिंग सेक्टर्ससाठी सेवा पुरवल्या जातात. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.trf.co.in/
हे पण वाचा :
HSBC Bank ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर तपासा
Kotak Mahindra Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा
SBI कडून ‘या’ स्पेशल FD च्या गुंतवणूकीची शेवटची तारीख वाढवण्यात आली
WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन
SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे