TATA ने भारतात सुरू केलं iPhone चे उत्पादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार टाटा ग्रुपने (Tata Group) भारतात एप्पल आयफोन (iPhone) चे उत्पादन सुरू केले आहे . टाटा ग्रुपने या आधीच एप्पल ची सप्लायर कंपनी विस्ट्रोन च्या बंगलोर जवळील नरसापुर मध्ये एका फॅक्टरीचे हस्तांतरण केले होते .आता त्याच फॅक्टरीत आयफोन चे उत्पादन सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच एप्पल चे सीईओ टीम कुक जेव्हा भारतातील पहिल्या ऍप्पल स्टोरचे उदघाटन करण्यास मुंबईत आले होते. तेव्हा त्यांनी टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांची भेट घेतली होती असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जाते आहे आणि त्यानंतरच काही आठवड्यात टाटा ने बंगळूर येथे आयफोनचे उत्पादन सुरू केले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार एप्पलचे सीईओ टीम कुक आणि टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांच्यात झालेल्या त्या मीटिंग दरम्यान टाटा ग्रुपच्या मेगा इलेक्ट्रिक उत्पादना बाबत चर्चा झाली असं मानले जाते की त्यावेळी टाटा ग्रुप आणि एप्पल कंपीनीचे सीईओ यांच्यात बऱ्याच विषयांवर भागीदारी बद्दल चर्चा करण्यात आली तरीही टाटा विस्ट्रोन मध्ये आयफोनचे उत्पादन करणार की नाही हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.

टाटा ग्रुप चे काही निवडक अधिकारी बंगलोर मध्ये सध्या आयफोन संदर्भातील प्रोजेक्टचे काम पाहत आहे ज्याचे मॉनिटरिंग टाटा ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखर करत आहेत या ऑपरेशन्स हे निगडित असलेले सर्व लोक या नवीन कामासाठी आता सज्ज आहेत याशिवाय या कामात विस्ट्रोन आणि ऍप्पल चे अधिकारीही त्यांना मदत करतील . सूत्रांच्या माहितीनुसार टाटा समूहाने ने बंगलोर मधील प्लांटमध्ये एप्पल चे उत्पादन सुरू केले आहे