Tax Free Income | प्रत्येक व्यक्तीला त्यांनी कष्टाने कमावलेल्या पैशावर कर सरकारला द्यावा लागतो. परंतु सगळ्यांनाच असे वाटते की आपण कमावलेल्या कष्टाच्या पैसावरचा कर वाचायला पाहिजे. त्यासाठी विविध प्रकारचे उपाय देखील करत असतात. परंतु असे काही उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. ज्यावर तुम्हाला कर भरावा लागत नाही. यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज लागत नाही. परंतु या गोष्टीची माहिती असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या कमाईच्या कराच्या कक्षेत येत नाही
वारसा हक्काने मिळालेली संपत्ती | Tax Free Income
तुम्हाला तुमच्या पालकांकडून कोणत्याही प्रकारची मालमत्ता, दागिने आणि रोख रक्कम मिळाली असेल, तर त्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. तुमच्या नावावर इच्छापत्र असेल तर त्याद्वारे प्राप्त झालेल्या रकमेवर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. तसेच त्या मालमत्तेतून तुम्ही जर कोणतीही संपत्ती कमावली, तरी देखील त्यावर तुम्हाला कर भरावा लागत नाही
लग्नाची भेट
तुमच्या लग्नात तुमच्या नातेवाईकांनी किंवा मित्रांनी जर एखादी महागडी भेटवस्तू दिली, तर त्यावर देखील तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. त्याचप्रमाणे तुमच्या लग्नाची भेट ही आज किंवा सहा महिन्यांनी जरी दिली, तरी देखील त्यावर तुम्हाला कर भरावा लागणार नाही. परंतु भेट वस्तूची किंमत ही 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर कर आकारला जाईल.
भागीदारी फर्मकडून मिळालेला नफा
एखाद्या कंपनीत जर तुम्ही भागीदार असाल आणि तुम्हाला नफ्याचा वाटा म्हणून कोणतीही रक्कम मिळाली, तर त्यावर देखील तुम्हाला कर भरावा लागणार नाही. तुमच्या भागीदारी फर्म नाही या रकमेवर आधीच कर भरला आहे. जर तुम्हाला फोन करून पगार मिळत असेल तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल
जीवन विमा दावा किंवा परिपक्वता रक्कम
तुम्ही जर जीवन विमा पॉलिसी घेतली असेल तर त्यावरील परिपक्वता पूर्णपणे करमुक्त आहे. पॉलिसीची वार्षिक प्रीमियम त्याच्या विमा रकमेच्या 10% पेक्षा जास्त नसावा. अशी देखील जास्त असल्यास जादा रकमेवर कर आकारला जाईल. ही सवलत काही गोष्टींमध्ये 15 टक्क्यांपर्यंत असू शकते.
शेअर किंवा इक्विटी MF मधून प्राप्त झालेले रिटर्न्स | Tax Free Income
जर तुम्ही शेअर किंवा इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली असेल, आणि त्याची विक्री केल्यावर तुम्हाला मिळणारे 1 लाख रुपये हे करमुक्त आहे. हा परवाना दीर्घकालीन भांडवली नफा अंतर्गत मोजला जातो. या रकमेपेक्षा जास्त परताव्यावर तुम्हाला कर लागू शकतो.