Tax Saving Tips : ‘या’ 5 योजनांमध्ये गुंतवणूक करून वाचवा येईल टॅक्स, कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tax Saving Tips  : आता आर्थिक वर्ष संपण्याची वेळ जवळ आली आहे. चालू आर्थिक वर्षात (FY23) कर बचत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. आता आपलाकडे कर बचत गुंतवणुकीसाठी जास्त वेळ शिल्लक नाही. जर आपण अजूनही कुठे गुंतवणूक केली नसेल, तर ती लवकरात लवकर करा. हे जाणून घ्या कि, जुन्या टॅक्स सिस्टीमचा वापर करून, करदात्यांना कलम 80C, 80D, 80TTB, 80E, 80G अंतर्गत उपलब्ध असलेल्या सवलतींचा लाभ घेऊन आपले कर दायित्व कमी करता येईल. आज आपण अशा 5 टॅक्स सेव्हिंग स्कीम बाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक करून टॅक्समध्ये सूट मिळण्या बरोबरच चांगला रिटर्नही मिळेल.

Benefits of health insurance india mhsa - Health Insurance: आरोग्य विमा  खरेदी करण्याचे आहेत हे 5 फायदे, अडचणीत होईल मोठी मदत – News18 लोकमत

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी

हे लक्षात घ्या कि, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यावर कलम 80D अंतर्गत टॅक्स सूट उपलब्ध आहे. 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना 25,000 रुपयांपर्यंतच्या प्रीमियमवर कपातीचा लाभ मिळतो, मात्र 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 50,000 रुपयांपर्यंतच्या प्रीमियमवर सूट मिळते. या कलमांतर्गत, आपल्या ज्येष्ठ नागरिक पालकांसाठी हेल्थ इन्शुरन्स घेऊन टॅक्स सूट मिळवता येईल. Tax Saving Tips

PPF Account Holders: 5 Rules to Know Before Withdrawing PPF Contributions Prematurely

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

PPF मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट उपलब्ध आहे. या योजनेमध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळवता येऊ शकते. यावर सध्या 7.1 टक्के रिटर्न मिळत आहे. Tax Saving Tips

National Pension Scheme (“NPS”). By Jeevan Kumar | by Nitin Jogad | Nitin Jogad | Medium

नॅशनल पेन्शन सिस्टीम

वृद्धापकाळातील खात्री करण्यासाठी NPS हा एक चांगला पर्याय ठरू शकेल. यामधील गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत टॅक्स फ्री आहे. यामध्ये कलम 80CCD (1B) अंतर्गत वार्षिक 1.5 लाख आणि अतिरिक्त 50 हजार रुपये गुंतवता येतील. NPS मध्ये गुंतवणूक केल्याने इन्कम टॅक्समध्ये एकूण 2 लाख रुपयांच्या सवलतीचा लाभ मिळू शकेल. Tax Saving Tips

ICICI Bank, Yes Bank revise their Fixed Deposit (FD) rates: Check new rates  here - BusinessToday

टॅक्स सेव्हिंग एफडी

5 वर्षांच्या लॉक-इन कालावधी असलेल्या टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट उपलब्ध आहे. मात्र गुंतवणूक सुरु करण्याआधी ज्या एफडीमध्ये गुंतवणूक करणार आहात त्यावर कर बचत होईल आहे की नाही याची संपूर्ण माहिती बँकेकडून घ्या. Tax Saving Tips

Finbingo | ELSS

इक्विटी लिंक्ड बचत योजना

शेवटच्या क्षणी कर वाचवण्यासाठी इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम हा एक चांगला पर्याय ठरेल. यामध्ये बँकेच्या एफडीपेक्षा जास्त रिटर्न मिळतो. टॅक्स सेव्हिंग ELSS बद्दल एक खास बाब अशी कि, त्याचा लॉक-इन कालावधी फक्त 3 वर्षांचा आहे. ELSS मध्ये SIP आणि एकरकमी गुंतवणूक करता येते. Tax Saving Tips

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html

हे पण वाचा :
विमानातील लघवीप्रकरणी Air India ला 30 लाखांचा दंड, DGCA ची मोठी कारवाई
Ration Card : मोफत रेशन घेणाऱ्या करोडो लोकांसमोर उभे नवीन संकट, जाणून घ्या त्याविषयीची माहिती
Income Tax वाचवण्यासाठी 31 मार्चपर्यंत करा ‘हे’ काम, बचतीबरोबरच मिळेल मोठा फंड
Kisan Credit Card म्हणजे काय ??? याद्वारे अशा प्रकारे मिळवा स्वस्त दरात कर्ज !!!
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवणूक करून मिळवा 16.26 लाख रुपये !!!