शिक्षकाने विद्यार्थिनींना अश्लील विडिओ दाखवून केले लगट; सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । शिक्षकानेच सातवीच्या विद्यार्थिनींना अश्लील विडिओ दाखवून लगट केल्याचा धक्कादायक प्रकार सिडको परिसरातील एका शाळेत तीन आठवड्यापूर्वी घडला. विद्यार्थिनीने पालकांना सांगितल्या नंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी शिक्षकाविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिडको भागातील एका शाळेमध्ये सातवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेतील शिक्षकानेच मोबाईल मध्ये पॉर्न व्हिडीओ दाखवला आहे.

ही घटना सुमारे तीन ते चार आठवड्यापुर्वीचीआहे. मुलींच्या वागण्यात बदल आल्याने पालकांनी विश्वास घेऊन विचारल्यावर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार मुलींनी पालकांना सांगितल्या नंतर पोलीस आयुक्तकडे या बाबत तीन दिवसांपूर्वी तक्रार करण्यात आली होती.

आज पालकांनी त्या शिक्षकांचे निलंबन करण्यात यावे यासाठी शाळेत धाव घेतली होती. सर्व पालकांनी शाळेच्या मुख्यधपकला घेऊन सिडको पोलीस ठाणे गाठले होते.या प्रकरणी दुपारी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडून सुमारे तीन ते चार आठवडे होत आहे.पालकांनी घडलेला प्रकार शाळा प्रशासनाला सांगितला होता.त्या नंतर संबंधित शिक्षकावर कारवाई होणे गरजेचे होते.मात्र तसे न करता 7 वि वर्गातून काढून संबंधित शिक्षकाला 1ली ते 5 वी वर्गात वर्ग केले. या वरून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.