Delhi Opinion Poll: दिल्लीवर पुन्हा ‘आप’ची सत्ता तर भाजपासाठी अजूनही दिल्ली दूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा पुढच्या ३ दिवसात थंड होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात जोर लावला आहे. येत्या ८ फेब्रुवारीला मतदान होणार असून आम आदमी पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्य लढत होतांना दिसत आहे. दरम्यान, टाइम्स नाऊ आणि इप्सोसने (आयपीएसओएस) संयुक्तरित्या केलेल्या मतदानपूर्व चाचणीमध्ये दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला पसंती दिल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. या मतदानपूर्व सर्वेक्षणानुसार दिल्लीचा गढ ‘आप’च राखणार असून भाजपासाठी अजूनही दिल्ली दूर असल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे.

सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार दिल्लीच्या ५२ टक्के मतदारांनी ‘आप’ला समर्थन दर्शवलं. तर ३४ टक्के जनतेने भाजपाला समर्थन दिलं आहे. भाजपासाठी दिलासादायक बाब म्हणजे त्यांच्या मतांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता या सर्वेक्षणामधून व्यक्त केली आहे. २०१५ साली झालेल्या निवडणुकीपेक्षा यंदा ‘आप’ला कमी मते मिळतील असा अंदाज या सर्वेक्षणात वर्तविला आहे.

२०१५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला ५५ टक्के मते मिळाली होती. मात्र, यंदा हा आकडा ५२ टक्के इतका असेल असा अंदाज आहे. सोबतच मागच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा ‘आप’ला अडीच ते तीन टक्के कमी मते मिळतील. तर दुसरीकडे भाजपाला २०१५ च्या तुलनेत यंदा १.७ टक्के अधिक मते मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

कोणाला किती जागा मिळतील

२०१५ साली दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळणाऱ्या ‘आप’चे संख्याबळ यंदा कमी होण्याची शक्यता या सर्वेक्षणातील आकडेवारीवरून दिसत आहे.’आप’ला विधानसभेच्या ७० पैकी ५४ ते ६० जागा मिळतील व भाजपाला १०-१४ जागांवर समाधान मानावे लागेल, असे या सर्वेक्षणात म्हटलं आहे. भाजपाला ३ जागांचा फायदा होणार आहे. तर काँग्रेसला दिल्लीत केवळ एक ते दोन जागांवर विजय मिळू शकतो, असंही या मतदानपूर्व चाचणीच्या आकडेवारीमधून दिसते. या मतदानपूर्व चाचणीत ‘आप’ला जरी जनतेने झुकते मॅप दिल असले तरी हे अंदाज किती खरे ठरतात हे ११ फेब्रुवारीलाच बघायला मिळाणार आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment