नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने राष्ट्रकुल 2022 च्या (CWG 2022) महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीत यजमान (CWG 2022) इंग्लंडचा 4 धावांनी पराभव अंतिम फेरीत धडाकेबाज प्रवेश केला आहे. या सामन्यात (CWG 2022) प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात उतरलेला इंग्लंडचा संघ केवळ 160 धावा करू शकला. भारतीय महिला क्रिकेट संघाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत (CWG 2022) धडक मारून इतिहास रचला आहे.
स्नेह राणाची फिरकी प्रभावी
भारतानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनं एकवेळ सामन्यावर मजबूत पकड घेतली होती. पण स्नेह राणाच्या ऑफ स्पिननं कमाल केली. राणा भारताची सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिनं आपल्या 4 षटकात 28 धावात दोन विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफूटवर धाडलं. अखेरच्या षटकात इंग्लंडला 14 धावांची गरज होती. अशा परिस्थिती राणानं अचूक गोलंदाजी करत भारताच्या विजयात (CWG 2022) मोलाची भूमिका पार पाडली.
फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना कोणाशी होणार?
फायनलमध्ये (CWG 2022) टीम इंडियाचा सामना कोणाशी होणार हे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनलच्या निकालावरून स्पष्ट होईल. या विजयाबरोबर टीम इंडियाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील (CWG 2022) क्रिकेटमधील पहिले पदक निश्चित केले आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???