मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG) मध्ये भारत, यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या चार टीम्स मध्ये सेमीफायनल रंगणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा ज्या संघाविरुद्ध सामना होणार आहे त्या संघाने टी 20 मध्ये एकदा, दोनदा नाही तर चक्क 17 वेळा भारतीय महिला संघाचा पराभव केला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा फायनलमध्ये (CWG) पोहोचण्याचा मार्ग खडतर असणार हे मात्र नक्की.
कोण कोणाविरुद्ध खेळणार
CWG मध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये सेमीफायनलचा सामना होणार आहे तर दुसरी सेमीफायनल ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांमध्ये होणार आहे. दोन्ही सामने 6 ऑगस्ट रोजी होणार आहेत.
इंग्लंड विरुद्ध 17 T20 सामने हरले
सेमीफायनल ते फायनल पर्यंतचा प्रवास (CWG) भारतीय महिला क्रिकेट संघासाठी खूप कठीण आहे. भारत आणि इंग्लंडच्या महिला संघात टी 20 मध्ये आतापर्यंत 22 सामने झालेत. त्यात 22 पैकी 17 वेळा इंग्लंडची टीम जिंकली आहे. फक्त 5 वेळाच भारतीय संघाला विजय मिळाला आहे. इंग्लंडचा संघ आपल्या होमग्राउंडवर खेळत आहे हि त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. इंग्लंडने मायदेशात भारताविरुद्ध 8 टी 20 सामने खेळले आहेत त्यामध्ये इंग्लंडने 6 तर भारताने 2 सामने जिंकले आहेत.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!