खरंच सांगतो, तेव्हा मनात एक धाकधूक होती… राज ठाकरे असं का म्हणाले? मनसेकडून टिझर रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 17वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने मनसेने आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक टिझर शेअर केला आहे. 1 मिनिट 12 सेकंदाचा हा टीझर आहे. यामध्ये स्वतः राज ठाकरेंचा आवाज आहे. जेव्हा आपण मनसेची स्थापना केली तेव्हा मनात धाकधुक होती . मी एका ध्येयाने बाहेर पडून महाराष्ट्रासाठी नवं असं काही तरी उभं करायला निघालो होतो अशावेळी तुम्ही माझ्यासोबत आहे. याच्या इतकी आनंदाची बाब ती काय? असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्यापूर्वीची आणि मनसे स्थापन करण्यापर्यंतची त्यांची मानसिकता कशी होती, याची थोडक्यात माहिती या व्हिडिओ द्वारे दिली आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत –

माझ्या सर्व मनसैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र…

जेव्हा आपण महाराष्ट्र निर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा खरंच सांगतो. मनात एक धाकधूक होती. मी एका ध्येयाने बाहेर पडून महाराष्ट्रासाठी नवं असं काही तरी उभं करायला निघालो होतो. पण तुम्ही हे कसं स्वीकाराल? लोकं कसं स्वीकारतील मनात ही एक धाकधूक होती. पण 19 मार्च 2006च्या पक्षस्थापनेनंतरच्या शिवतीर्थावरच्या सभेत मी व्यासपीठावरती पाऊल ठेवलं. समोर पसरलेला अलोट जनसमुदाय पाहिला. आणि मनातील शंका दूर झाली. माझ्यासह कोणालाही हेवा वाटेल अशी मनसैनिकांची अचाट शक्ती होती. ती कितीही खाचखळगे आले अडचणींचा डोंगर उभा राहिला, तरीही माझ्यासोबत आहे. याच्या इतकी आनंदाची बाब ती काय?

सदैव आपला नम्र राज ठाकरे… जय हिंद जय महाराष्ट्र

आज राज ठाकरेंची सभा

दरम्यान, पक्षाच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सायंकाळी ठाण्यात सभा होत आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी ते मनसैनिकांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणं तर महत्त्वाचे आहेत. याशिवाय राज ठाकरे राज्यातील एकूण राजकीय परिस्थितीवर बोलण्याची शक्यता आहे. मनसेची एकूण भूमिका ही शिंदे- फडणवीस सरकारच्या बाजूने अनुकूल असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. त्यामुळे आजच्या त्यांच्या सभेत महाविकास आघाडीच टार्गेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .