हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणारी अनेक लोक आहेत. राज्यात मराठी भाषेचा विकास व संशोधनाला चालना मिळावी म्हणून राज्य सरकार कडून प्रयत्न केले जात आहे. या अनुषंगाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज महत्वाची घोषणा केली. “राज्यात मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असून विद्यापीठासाठी दहा दिवसांत एक समिती स्थापन केली जाणार असल्याची महत्वाची घोषणा सामंत यांनी केली.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले की, “राज्यात अनेक दिवसांपासून मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केले जावे अशी मागणी केली जात होती. त्यावर राज्य सरकारकडूनही विचार केला जात होता. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यात लकवरच मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे.”
मंत्री सामंत यांनी यावेळी अफगाणिस्थानधील विद्यार्थ्यांबाबत महत्वाची माहिती दिली. पुण्यात असलेल्या अफगाणी विद्यार्थ्यांसोबत चरचा केली आहे. त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या परंपरेनुसार आम्ही या विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.