हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2002 च्या गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदी यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी कट आखण्यात आला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड यांच्यासह तिघांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं आहे.
सेटलवाड यांच्यासह माजी पोलीस महासंचालक आरबी श्रीकुमार (निवृत्त) आणि माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनाही आरोपी करण्यात आले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आरोपींनी कट रचल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. सरकारचा भाग असूनही आरबी श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांनी तिस्तासाठी बनावट कागदपत्रे तयार केली.
आरोपींना नरेंद्र मोदी यांची राजकीय कारकीर्द संपवून त्यांची प्रतिष्ठा खराब करायची होती, असा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. त्यासाठी वकिलांची फौज बनावट कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे तयार करण्यात गुंतली होती. दंगलग्रस्तांच्या निवेदनात छेडछाड करून त्यांच्याकडून बनावट विधानांवर सह्या करण्यात आल्या. निवेदन इंग्रजीत असल्याने पीडितांना ते समजू शकले नाही.
एसआयटीने दावा केला आहे की आरबी श्रीकुमार यांनी साक्षीदाराला धमकी दिली होती की, जर तुम्ही तिस्ताला पाठिंबा दिला नाही तर मुस्लिम तुमच्या विरोधात जातील आणि तुम्ही दहशतवाद्यांचे लक्ष्य व्हाल. आपसात भांडायला लागलो तर शत्रूंनाही फायदा होईल आणि मोदींनाही.
एसआयटीच्या म्हणण्यानुसार, सेटलवाड यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी दंगलग्रस्तांसाठी उभारलेल्या शिबिरांमध्ये जाऊन त्यांना गुजरातमध्ये न्याय मिळणार नाही, असा विश्वास दाखवून त्यांची दिशाभूल केली आणि त्यांची प्रकरणे राज्याबाहेरील न्यायालयात नेली. तीस्ता सतत संजीव भट्ट यांच्या संपर्कात होती. ते पत्रकार, स्वयंसेवी संस्था आणि विरोधी पक्षनेत्यांच्या ई-मेलवरून संपर्कात होते. तो न्यायालय आणि इतर अधिकाऱ्यांना एसआयटीवर दबाव आणण्यास सांगत असे.