तहसीलदारांची तलाठ्यावर धडाकेबाज कारवाई; वाळू चोरी प्रकरणी केली कडक कारवाई

sand
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा : वाईचे तहसीलदार रंजित भोसले यांनी वाळु चोरांवर तातडीने गुन्हे आणी दंडात्मक कारवाई करण्याचे लेखी आदेश काढले आहेत. ओझर्डे येथील गाव कामगार तलाठी डी,डी, कुंभार यांनी तहसीलदार यांचा आदेश धुडकावून अवमान केल्याने तहसीलदार यांनी आता आपल्या अधिकाराचा वापर करून थेट तलाठ्या वरच कारवाईचा बडगा ऊगारल्याने तलाठी वर्गात खळबळ उडाली आहे. या तलाठ्याचे वाळु चोरांबरोबर आर्थिक देवान घेवान असल्यानेच त्याने गुन्हा दाखल करण्याचे धाडस केले नाही अशी चर्चा गावासह वाई तालुक्यातील नागरीकांन मध्ये सुरु आहे.

सविस्तर वृत्त असे कि वाई तालुक्यातील ओझर्डे गावच्या हद्दीतील चंद्रभागा ओढ्याच्या पात्रातील दिवसा ढवळ्या विना परवाना हजारो ब्रास वाळु तलाठ्यांन बरोबर आर्थिक तडजोडी करुन चोरुन त्याच गावातील गेली कित्येक वर्षा पासून शासनाला लाखो रुपयांचा महसूल बुडवून मनोज भोईटे हा वाळूचा व्यवसाय करत असतो पण दि, २५ फेब्रुवारी रोजी मनोज भोईटे हा विना परवाना वाळू काढत असल्याची माहिती खबर्या मार्फत वाईचे तहसीलदार रंजित भोसले यांना मिळताच त्यांनी गाव कामगार तलाठी डि,डी, कुंभार यांना ओढ्याच्या पात्रात चोरुन उत्खनन होत असलेल्या ठिकाणी छापा टाकण्याचे मोबाईल वरुन आदेश दिले होते.

या प्रकरणी छापा टाकून वाळू चोर असणारा मनोज भोईटे याला 1लाख १८ हजार रुपये दंडाची नोटीस काढून ती तातडीने तलाठी आणी सर्कल मार्फत बजावून त्याची पोहच घेऊन पुन्हा त्यांच्या वर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पण कुंभार तलाठी याने वाईचे तहसीलदार यांचा लेखी आदेश धुडकावून वाळु चोरा बरोबर आर्थिक तडजोडी केल्यानेच वाईचे तहसीलदार रंजित भोसले यांनी कारवाईचा बडगा ऊगारल्याने तलाठी वर्गा मध्ये खळबळ उडाली आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group