रोम जळत होते, तेव्हा ‘निरो’ बासरी वाजवत होता : तेजप्रताप यादव यांची मोदींवर टीका

narendra modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशातील कोरोना मृत्यूचेही प्रमाण वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स अपुऱ्या पडत असताना कोरोना लसीचा तुडवडा जाणवत आहे. देशातील अनेक भागांत कडक लॉकडाऊन पुन्हा लावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच देशातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जेव्हा रोम जळत होते, तेव्हा ‘निरो’ बासरी वाजवत होता, अशा शब्दात बिहारचे माजी आरोग्यमंत्री आणि राजद नेते तेजप्रताप यादव यांनी मोदींवर टीका केली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ट्विटर युझर्सनी सोमवारी केली. ट्विटरवर २ लाख युझर्सनी हॅशटॅगचा वापर करत पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली. तर, काही युझर्सनी पंतप्रधान मोदींची तुलना ‘निरो’शी केली.

बिहारचे माजी आरोग्यमंत्री आणि राजद नेते तेजप्रताप यादव यांनीही यामध्ये सहभागी होत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. जेव्हा रोम जळत होते, तेव्हा ‘निरो’ बासरी वाजवत होता, अशी टीका यादव यांनी केली आहे. देशातील जनतेचे संरक्षण करू शकत नसाल, तर अशा पंतप्रधानाची देशाला गरज काय, अशी विचारणा काँग्रेस नेते असलम बाशा यांनी केली असून, पंतप्रधान मोदींनी जमिनीवर येऊन काम करावे, अशी मागणी केली आहे.