हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Telegram कडून आपल्या मंथली सबस्क्रिप्शनची किंमत कमी करण्यात आली आहे. भारतातील प्रीमियम युझर्ससाठी कंपनीने ही घोषणा केली आहे. यानंतर आता टेलिग्रामच्या प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी 469 रुपयांऐवजी 179 रुपये द्यावे लागतील. टेलिग्राम कडून भारतातील आपल्या युझर्सना पाठवलेल्या मेसेजमध्ये सबस्क्रिप्शन फी माफ केल्याची माहिती दिली आहे.
भारतीय युझर्सना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचे म्हंटले जात आहे. हे जाणून घ्या कि, WhatsApp कडे सुमारे 500 लाख युझर्स आहेत. जागतिक स्तरावर 700 लाख ऍक्टिव्ह मंथली युझर्ससह भारत हा टेलीग्रामसाठी प्रमुख बाजारपेठांपैकी एक आहे.
थर्ड पार्टी डेटानुसार, टेलीग्रामचे भारतात 120 लाख युझर्स आहेत. जगभरातील प्रीमियम युझर्ससाठी Telegram चे मंथली सबस्क्रिप्शन $4.99 ते $6 पर्यंत आहे.
Telegram प्रीमियम युझर्सना 4GB पर्यंतच्या फाईल्स अपलोड करता येतात. हे लक्षात घ्या कि, टेलीग्रामवर युझर्सना फ्री मध्ये 2GB ची मर्यादा मिळते. कंपनीचा दावा आहे की तसेच प्रीमियम युझर्सना जास्त वेगाने मीडिया फाईल्स डाउनलोड करता येतात, असा दावा टेलीग्राम कडून करण्यात आला आहे.
पैसे दिलेल्या युझर्ससाठी वापरासाठी डबल लिमिट आहे, कारण त्यांना 1,000 चॅनेल्समध्ये सामील होता येते. तसेच त्यांना प्रत्येक 200 चॅटसह 20 चॅट्सचे फोल्डर देखील तयार करता येतात.
यासोबतच Telegram प्रीमियम युझर्सकडे आपल्या व्हॉइस मेसेजना टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट करण्याचा पर्याय देखील असेल. या पोस्टमध्ये असेही म्हटले गेले आहे की, प्रीमियम युझर्सना एक्सक्लूसिव्ह स्टिकर्स, एक्स्ट्रा इमोशन आणि एक्सप्रेशन इफेक्ट देखील मिळतात, जे मेंबर्सना फ्रीमध्ये पाहता येतील.
तसेच प्रीमियम युझर्सना नवीन आयकॉन मिळतात जे ते त्यांच्या होम स्क्रीनवर जोडू शकतात. जे आपल्याला प्रीमियम स्टार, नाईट स्काय किंवा टर्बो-प्लेनमधून निवडता येतील. तसेच या ऍपचे प्रीमियम व्हर्जन असलेल्या ग्राहकांना जाहिराती दिसत नाहीत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://telegram.org/
हे पण वाचा :
Share Market Holiday : साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त ऑक्टोबरमध्ये इतके दिवस शेअर बाजार राहणार बंद
e-PAN Card डाउनलोड करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स
SOVA Trojan : सावधान !!! जर आपल्या फोनमध्ये आला असेल ‘हा’ व्हायरस तर …
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे ताजे दर तपासा