सुनेला घराची कामे सांगणे म्हणजे क्रूरता नाही, औरंगाबाद खंडपीठाने नोंदवले मत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – सुनेला घरातील कामे सांगणे हे क्रूरता नाही (domestic violence case) असे मत औरंगबाद खंडपीठाकडून व्यक्त करण्यात आले आहे. एका महिलेने आपल्या पती आणि सासूविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार (domestic violence case) दाखल केल्यानंतर त्यावर निर्णय देताना औरंगबाद खंडपीठाने हे मत नोंदवले आहे. आपल्याला मोलकरणीप्रमाणे राबवले जाते तसेच चार लाख रुपये हुंडा आणण्यासाठी आपल्यावर दबाव आणला गेला असल्याचे या महिलेने आपल्या तक्रारीत म्हंटले होते.

कोर्टाने काय दिला निर्णय ?
या प्रकरणात एका विवाहित महिलेला घरात काम करण्यास सांगितले तर त्याचा अर्थ आपल्याला मोलकरणीप्रमाण राबवले जात आहे हा आरोप चुकीचा असल्याचे कोर्टाने सांगितले. जर घरात काम करायचे नव्हते तर लग्नापूर्वीच याबद्दल स्पष्ट करायला हवे होते, त्यामुळे पुढे अशा प्रकारच्या समस्या उद्भवल्या नसत्या असे कोर्टाने म्हटले आहे.

काय लिहिले तक्रारीमध्ये ?
सासू आणि नणंदने मुलगा व्हावा म्हणून आपल्याव दबाव आणला तसेच आपल्याला मारहाणदेखील केली. एवढेच नाहीतर माहेरहून 4 लाख रुपये हुंडा आणण्यासाठी आपल्यावर आणि माहेरच्या माणसांवर दबाव आणल्याचे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. त्यानंतर या महिलेने 27 जून 2020 रोजी नांदेडमध्ये आपल्या सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी महिलेच्या पती, सासू आणि नणंदविरोधात घरगुती हिसांचाराप्रकरणी (domestic violence case) गुन्हा दाखल केला.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती