कराड | टेंभू-सयापूर-कोरेगाव उपसा जलसिंचन योजनेची चेअरमन, व्हा. चेअरमनपदाची निवड टेंभू येथे पार पडली. चेअरमनपदी टेंभूचे जयवंत किसन पाटील (जे.के.) तर व्हा. चेअरमनपदी गोवारेचे मानसिंग बाबुराव सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. आर. मोरे यांनी काम पाहिले.
चेअरमन, व्हा. चेअरमनपदाच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. आर. मोरे यांच्याहस्ते चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित संचालक हणमंत कदम, लालासोे डुबल, दिलीप पाटील, सुरेश पाटील, भिमराव माने, मिलींद सुर्वे, सुमन पाटील, शारदा बाबर, यशवंत मोहने, जयप्रकाश गुरव, मोहन लेंगरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक विलास भंडारे, टेंभू-सयापूर विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बब्रुवान पाटील, दत्तात्रय चरेगावकर, टेंभूचे माजी उपसरपंच तात्यासो लेंगरे, प्रताप सावंत, शिवलिंग जंगम, माणिक ठोंबरे, विनायक कदम, टेंभू ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संजय कुंभार, सुभाष शिंदे, रमेश जाधव, बाळासो पाटील, संजय जाधव, केशव सावंत, आनंदा वाघमारे, पिंटू घोरपडे, नंदकुमार डुबल, बाबरमाची ग्रामपंचायत सदस्य अधिक पाटील, सयाजी देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.