विनापरवानगी ‘आक्रोश’ केल्याने अंबादास दानवेंसह दहा जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद – महागाई विरोधात काल शहरात शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला पोलिसांची नसतांनाही हा मोर्चा काढल्याने आमदार तथा जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्यासह दहा जणांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.ही माहिती ठाण्याचे पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे यांनी दिली.

शिवसेनेने महागाईचा निषेध करण्यासाठी अणि केंद्र सरकारच्या विरोधात क्रांती चौकातून आक्रोश मोर्चा काढला.या मोर्चाला संजय राऊत यांच्यासह माजी खा. चंद्रकांत खैरे, मंत्री. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, आ. संजय शिरसाठ, अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल अशा अनेक नेत्यांनी हजरी लावली होती. राज्यात सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता अजूनही संकट टळले नाही तरी सत्तेतील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी मोर्चाचे आयोजन केले होते.

पोलिस आयुक्तांच्या परवानगीशिवाय हा मोर्चा काढण्यात आला असल्याने विना परवानगी मोर्चा काढण्यासह अन्य कलमातंर्गत हा गुन्हा दाखल केला गेला आहे.