सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडे विस्फोट निर्माण करणारे येत आहेत, सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधित हजारांच्या पटीने वाढले आहेत. तर दुसरीकडे बाधितांच्या आजपर्यंत मृत्यू पावलेल्याची संख्या दोन हजारांच्या पार झाली आहे. एकदंर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या घरात पोहचली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 184 जण कोरोनाबाधित आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 77 हजार 584 आहे. तर जिल्ह्यात एकूण 64,566 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. सध्या जिल्ह्यात 9 हजार 890 उपचारार्थ दाखल रुग्ण आहेत.
कोरोना बाधितांची वाढणारी संख्या जिल्ह्यासाठी चिंताजनक बनत आहे. काल रात्रीपासून संचारबंदी सुरू होणार असल्याने काही दुकाने बंद दिसत आहेत. मात्र रस्त्यांवर लोकांची गर्दीचे चित्र पहायला मिळत आहे. लोक रस्त्यांवर येत असले तरी पोलिस प्रशासनाकडून शहरात येणाऱ्या मुख्य ठिकाणी चेकिंग केले जात आहे. तसेच अनावश्यक कारणांसाठी येणाऱ्या लोकांच्यावर कारवाई केली जात आहे. जिल्ह्यात रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बेड शिल्लकीचे प्रमाण कमी असून जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडू लागला आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा