सातारा | पुणे- बंगळूर महामार्गावर सातारा शहराजवळ शेंद्रे गावाच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. साताऱ्याकडून कराडच्या दिशेने निघालेल्या एर्टीगा कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असणार्या दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात सहाजण गंभीर जखमी असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात अपघाताच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत.
दरम्यान, अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच हे सर्व प्रवासी सातारा शहरातील कामाटीपुरा परिसरातील आहेत. या घटनेची माहिती होताच छत्रपती शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सची टीम तत्काळ अपघातस्थळी दाखल झाली. त्यांनी जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच जखमींच्या नातेवाईकांना सुध्दा कळविण्यात आलं आहे.
सातारा शहराजवळ शेंद्रे गावाच्या परिसरात सातबारा हॉटेल आहे. या हॉटेलच्या परिसरात हा अपघात घडला. एर्टीगा कारमधून काही प्रवसी साताऱ्याहून कराडकडे जात होते. यावेळी भरधाव वेगता असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यानंतर एर्टीगा कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघताचाी तीव्रता जास्त असल्यामुळे कारमधील सहाजण जखमी झाले. तसेच दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.