टायर फुटल्याने दोन एस.टी.चा भीषण अपघात; चालक गंभीर, प्रवासी सुखरूप

0
52
Bus Accident
Bus Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | समोरील टायर फुटल्याने नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या एस.टी.ला बस धडकली. दरम्यान दोन्ही बस एकमेकांत अडकल्याने सुमारे दोनशे फूट दोन्ही बस घासत गेल्या. या अपघातात चालक गंभीरपणे जखमी झाला आहे.सुदैवाने दोन्ही बस मधील प्रवासी सुखरूप असून कुणालीही इजा झालेली नाही. मात्र एस. टी.चे मोठे नुकसान झाले. ही घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास औरंगाबाद-सिल्लोड महामार्गावरील भवन शिवार जवळील पेट्रोलपंपासमोर घडली. शेख मोहसीन शेख रफिक (रा. फेसपुरा, जि.जळगाव) असे जखमी एस. टी. बस चालकांचे नाव आहे.

या अपघात प्रकरणी अधिक माहिती अशी की, औरंगाबाद कडून सिल्लोडच्या दिशेने जाणारी (एम.एच.20 वाय 5186) या क्रमांकाची औरंगाबाद- रावेर या एस. टी.बसचे महामार्गावरील भवन शिवारातील पेट्रोल पंप समोर समोरील टायर अचानक फुटले आणि चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला. दरम्यान समोरून भरधाव वेगात येणाऱ्या (एम.एच.20 बी.एल.4095) या क्रमांकाच्या जळगाव-पुणे या एसटी बसला रावेरकडे जाणारी बस धडकली.

दोन बस एकमेकांत अडकल्या आणि दोन्ही बस सुमारे दोनशे फूट घासत गेल्या. या भीषण अपघातात बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला. यामध्ये चालक शेख हे गंभीरपणे जखमी झाले. त्यांना गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी सिल्लोड रुग्णालयात हलविले. तर दोन्ही बस मध्ये सुमारे 19 प्रवासी होते. या थरारक अपघातातून सर्व प्रवासी सुखरूप बचावले. या घटने प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here