नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2013 मध्ये उत्तराखंड मध्ये झालेला प्रलयकारी ढगफुटी (cloudburst) आठवली तर आजही अंगावर काटा येतो. जून महिन्यात 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडला ज्यामध्ये चोरबारी ग्लेशियर वितळले आणि मंदाकिनी नदीतील पाण्याची पातळी वाढली. त्या भीषण पुरामुळे उत्तराखंडाचा मोठा भाग प्रभावित झाला आणि या नैसर्गिक आपत्तीत पाच हजाराहून अधिक लोक मरण पावले होते पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना गुरुवारी सायंकाळी चोरबारी ग्लेशियर पाणलोट क्षेत्रात पाहायला मिळाली.
https://twitter.com/Brave_spirit81/status/1573204609782452225
चोरबारी ग्लेशियर पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा हिमस्खलनात (avalanche) झाल्याचे पाहायला मिळाले. या हिमस्खलनात कोणतेही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप तरी आलेले नाही. मात्र संबंधित अधिकारी या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियावर या संदर्भातला एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत आपण पाहू शकता पवित्र केदारनाथ मंदिराच्या आसपासच्या डोंगरावर हिमस्खलन (avalanche) मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. केदारनाथ खोऱ्यातील हवामान गेल्या काही दिवसांपासून खूपच खराब असल्याचे दिसून येत आहे. हिमस्खलनाचा धोका असलेला भाग चोरबारी ग्लेशियर पाणलोट क्षेत्र म्हणून ओळखला जातो. हे ठिकाण केदारनाथ मंदिर परिसरापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?