व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

रिसॉर्टमधील रिसेप्शनिस्टच्या हत्येप्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तराखंड राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तराखंड राज्यातील पौडी गढवाल जिल्ह्यातील एका खाजगी रिसॉर्ट मध्ये रिसेप्शनिस्टची हत्या (murder) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणीचे नाव अंकिता भंडारी असे आहे. अंकिता मागील दोन ते तीन दिवसापासून बेपत्ता होती. मात्र अद्यापही अंकिताचा मृतदेह (murder) हाती लागला नाही. सध्या पोलीस आणि SDRF यांची टीम युद्धपातळीवर अधिक तपास करत आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी पुलकित आर्यासह तीन लोकांना अटक केली आहे. पुलकित आर्या हा मोठ्या भाजप नेत्याचा मुलगा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अंकिता जिथे काम करत होती त्या रिसॉर्टचा संचालक हा पुलकित आर्याच होता. रिसॉर्टचे संचालक आणि मॅनेजर हे अंकिता बेपत्ता झाल्याचे समोर येतात फरार झाले होते.

पोलिसांना रिसॉर्टचा संचालक पुलकित आर्याने दिलेल्या माहितीनुसार, “अंकिता भंडारी ही मागील काही दिवसांपासून तणावाने ग्रस्त होती. यामुळे पुलकित आर्या तिला 18 सप्टेंबर रोजी ऋषिकेशला फिरायला घेऊन गेला. त्या दिवशी ते रात्री उशिरा परतले. त्यानंतर ते रिसॉर्ट मध्ये वेगवेगळ्या रूम मध्ये सगळेजण झोपायला गेले. मात्र सकाळी अंकिता तिच्या रूम मधून गायब झाली होती.

पोलीस त्यांचे काम करत आहेत – CM धामी
ऋषिकेशमधील घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत पोलिसांना सक्त आदेश देण्यात आले आहेत. ज्यांनी कोणी अपराध केला आहे त्यांना लवकरात लवकर शिक्षा दिली जाईल. पोलीस त्यांचे कार्य करत असून पोलीस पीडितेला न्याय देतील अशी प्रतिक्रिया उत्तराखंडचेमुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिली आहे.

हे पण वाचा :
Bandhan Bank च्या बचत खाते अन् FD वरील व्याजदरात वाढ !!!
गेट उघडायला थोडा उशीर झाला तर महिलेकडून गार्डला शिवीगाळ आणि मारहाण
आता ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज !!!
पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहून भडकलेल्या पत्नीने भाजप नेत्याची रस्त्यावरच केली धुलाई
‘साला, आजकाल सीनियरिटीचं कुठं काही राहिलंच नाही’, संजय शिरसाट यांनी नाराजी बोलून दाखवली