मणिपूरमध्ये अतिरेकी हल्ला; कमांडिंग ऑफिसरचा पत्नी आणि मुलासह मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांच्या तुकडीवर आयईडी हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. म्यानमार सीमेजवळील मणिपूरमधील चुराचंदपूर येथे हा हल्ला झाला आहे. यामध्ये कमांडिंग ऑफिसर त्याची पत्नी, मुलगा  , शीघ्र कृतीदलाचे जवान होते. कमांडिंग ऑफिसर सह आसाम रायफल्सचे चार जवान आणि कमांडिंग ऑफिसरच्या पत्नीचा आणि मुलाचा  मृत्यू झालाय, अशी माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १०.०० वाजल्याच्या सुमारास सूरज चंद जिल्ह्याच्या म्यानमार सीमेजवळ सिंगनगट उपखंडातील एस सेहकेन गावात ही घटना घडलीय. या भागातून लष्करी अधिकाऱ्यांचा ताफ जात असताना आधीपासूनच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. हे अमानवीय आणि दहशतवादी क्रृत्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अशा प्रकारचे भ्याड कृत्य करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. असा इशारा दिला आहे.