मुंबई प्रतिनिधी |श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आता भारत देखील दहशतवादी हल्ला घडवून आणला जाण्याची शक्यत आहे. बंगळूरू पोलिस ठाण्यात एका व्यक्तीने फोन करून भारतात दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती दिली आहे.
राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट ; राहुल गांधी यांनीच दिला पक्ष बदलण्याचा सल्ला
या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार भारतात आठ राज्यात दहशतवादी हल्ला घडवून आणला जाण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडू मधील रामनाथपूरम येथे १९ दहशतवादी लपून बसल्याचे देखील या व्यक्तीने फोन वरून सांगितले आहे. कर्नाटकच्या डीजीपींनी केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगना, महाराष्ट्र, गोवा आणि पॉडेचेरी या देशातील आठ राज्यात दहशतवादी हल्ला घडवण्यात येणार आहे अशी माहिती त्या व्यक्तीने फोन वरून दिली आहे.
पार्थ पवार यांच्या सभेकडे लोकांनी फिरवली पाठ
या फोनची दखल घेवून देशभरच्या सुरक्षा व्यवस्थेने हाय अलर्ट जारी केला आहेत. तसेच महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये देखील हाय अलर्ट जरी करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना देखील हाय अलर्ट देण्यात आला आहे.
मतदान केंद्र अधिकाऱ्याच्या चुकीमुळे ‘या’ गावात होणार पुन्हा मतदान