हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातून एक मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील ब्लू बेल नावाच्या शाळेतील दोन मजल्यावर दहशतवादी प्रशिक्षण सुरू केलं होत. PFI या संघटनेकडून हे ट्रेनिंग दिलं जातं होतं. या घटनेची माहिती मिळताच एनआयएने हे दोन्ही मजले सील केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील एका शाळेत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी आणि प्रबोधन करण्यासाठी शिबिरे आयोजित करत होती आणि विशिष्ट समुदायाचे नेते आणि संघटनांवर हल्ले करण्यासाठी प्रशिक्षण देत होते. त्यांनतर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने रविवारी शाळेच्या इमारतीचे दोन मजले सील केले.
NIA ATTACHES 2 FLOORS OF PUNE SCHOOL BUILDING USED BY THE PFI AS TRAINING CENTRE pic.twitter.com/uXo61v067O
— NIA India (@NIA_India) April 17, 2023
भारताची एकता, अखंडता आणि सुरक्षा धोक्यात आणण्याच्या उद्देशाने दहशतवादी कारवाया करण्याची योजना आखण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी या ब्लु बेल शाळेच्या 4व्या आणि 5व्या मजल्याचा वापर PFI द्वारे करण्यात आला. याप्रकरणी UA (P) कायदा, 1967 च्या तरतुदी अंतर्गत NIA ने दहशतवादाची कार्यवाही म्हणून दोन मजले सील केले आहेत. तसेच PFI आणि अन्य लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.