हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील दुकानावरील पाट्या या मराठीत असण्यासंदर्भात ठाकरे सरकारने आज महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत ठाकरे सरकारकडून घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या दुकानावरील पाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहेत.
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत ठाकरे सरकारने मराठी भाषे संदर्भात चर्चा करताना एक मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबतचा. ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियमावर चर्चा करत मराठी पाट्याचा निर्णय घेण्यात आला.
• दहा कामगारांपेक्षा कमी असलेल्या आस्थापनांना सुद्धा मराठी पाट्या लावणे बंधनकारक
– मंत्री हसन मुश्रीफ
कामगार विभाग @mrhasanmushrif— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 12, 2022
ठाकरे सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे आता राज्यात मराठी पाट्या दुकानांवर झळकणार आहेत. दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या असून त्यावर उपाययोजना करण्याचीही सातत्याने मागणीही होत होती. याबाबत राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात संबंधितांची बैठक घेतली व कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला.