ठाकरे सरकारच ‘मुंबई मॉडेल’ खोटं : नितेश राणेंची सडकून टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईत कोरोना उपचाराच्या नियोजनावरून पंतप्रधानमंत्री यांनी कौतुक केले. त्यानंतर भाजपकडून या कौतुकावरही टीकास्त्र डागले गेले. यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही ठाकरे सरकारवर मुंबई मॉडेलवरून सडकून टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, ठाकरे सरकारचा मुंबई पॅटर्न हा निव्वळ खोटारडेपणा आहे. ठाकरे सरकार मुंबईतील रुग्णांची नोंद हि पुणे येथील रुग्णालयाच्या खात्यात करून येथील आकडेवारी कमी भासवत आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारच्या मुंबई पॅटर्नला गांभीर्यपूर्वक घेतल्याचे दिसून आलेले आहे. राणेंनी ट्विटरद्वारे पुन्हा एकदा ठाकरे सरकारला टार्गेट केल्यामुळे आता भाजपमधील इतर नेत्यांकडूनही ठाकरे सरकारवर निशाणा साधला जाणार असल्याचे दिसते. नितेश राणेंनी यापूर्वी अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. आता त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

 

त्या प्रश्नामध्ये मुंबईतील कोरोना रुग्णांची नोंद पुणे आणि इतर शहरांच्या खात्यात करणे, हाच ‘मुंबई पॅटर्न’ आहे का? अनेक लोकांनी मला याबद्दल माहिती दिली आहे. मुंबईत एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली की त्याला पुण्याच्या कोविड वॉर रुममधून फोन येतो. अशाप्रकारे ठाकरे सरकार मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी भासवत आहेत, अशा प्रकारे राणेंनी ठाकरे सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

वारंवार राणेंकडून टीका केली जात असल्यामुळे त्यांच्या या टीकेला महाविकास आघाडी सरकारमधील इतर नेते काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत पाहता ठाकरे सरकारच्या मुंबई मॉडेलचे पंतप्रधानमंत्री मोदी यांनी केलेले गोडकौतुक भाजपच्या पचनी न पडल्याचे यावरून दिसून येत आहे. तर दुसरीकडे ठाकरे सरकार मात्र मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा कशा प्रकारे कमी करता येईल यासाठी प्रयत्न करीत आहे.

Leave a Comment