हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्ष नेमका कोणाचा या वादावर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. यावेळी ठाकरे गटाकडून जयदत्त कामत आणि कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. शिंदे गट हा राजकीय पक्षच नाही. मूळ पक्ष आणि संघटना उद्धव ठाकरेंसोबत आहे असं म्हणत दोन्ही वकिलांनी शिवसेनेच्या घटनेचा मुद्दा उपस्थित करत प्रतिनिधी सभा घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
शिंदे गट हा राजकीय पक्षच नाही. शिंदे गटाच्या तुलनेत आमच्याकडे लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे. घटनेनुसार, प्रतिनिधी सभाच पक्ष चालवते, प्रतिनिधी सभा आमच्याकडे आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपण्यापूर्वी प्रतिनिधी सभा घ्या अशी मागणी करत ठाकरे गटाने निवडणूक आयोगापुढे मोठा डाव टाकला आहे.
शिंदे गटाचे बंद हे पक्षाच्या घटनेच्या विरोधात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्या घटनेचं उल्लंघन केलं आहे. शिवसेनेच्या घटनेत मुख्यनेते पदच नाही तर पक्षप्रमुख हेच मुख्य पद आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे पदच बेकायदेशीर आहे असं ठाकरे गटाचे वकिल जयदत्त कामत यांनी म्हंटल आहे. बंडखोर आमदार हे शिवसेना पक्षाच्या एबी फॉर्मवरच निवडून आले आहेत याकडे सुद्धा कामत यांनी लक्ष्य वेधले